(भिम टायगर सेनेकडून तक्रार देऊनही कुठलीही कारवाई नाही)
✒️ सिद्धार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक रिपोर्टर) मो.9823995466


उमरखेड (दिनांक 29 नोव्हेंबर) यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्याचे कृषी मंडळ अधिकारी हे बऱ्याच वर्षापासून उमरखेड येथील कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत. हे शासकीय कर्मचारी सेवा व शिस्त नेयमाने उमरखेड येथे दीर्घ काळापासून नियमबाह्य एकाच कार्यालयात कार्यरत आहे.

यापूर्वी देखील उमरखेड तालुक्यातील भिम टायगर सेनेच्या वतीने शामभाऊ धुळे जिल्हा (कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ) यांनी ही बाब वरिष्ठाच्या निर्देशनात आणून दिली होती.

परंतु अद्याप पर्यंत कोणतीही दखल घेतली गेली नाही. मग काय या वरिष्ठ अधिकाऱ्याला ओल्या पार्ट्याचा नैवेद्य दिला जातो का की मग राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे.


साहेबाचे मूळ निवासस्थान हे उमरखेड शहरापासून 80 किलोमीटर दूर असताना देखील त्यांना उमरखेड चा मोह का? यामागे आर्थिक स्वार्थ असल्याशिवाय खुर्ची सुटत नाही. अशा वेगवेगळ्या चर्चांनी उमरखेड मध्ये जोर धरला आहे.
