
(औदुंबर वाहन चालक युनियन उमरखेडची मागणी)
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 28 नोव्हेंबर) तालुक्यातील ढाणकी येथील एका जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षक शेख जमीर शेख नजीर याने इयत्ता सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आपल्याच शाळेतील अल्पवयीन विध्यार्थीनींचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी दि 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता घडली.


या घटनेचा निषेध करून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी औदुंबर वाहन चालक युनियन उमरखेड यांच्याकडून करण्यात आली आहे.
शनिवारचा दिवस असल्याने सकाळची शाळा होती शाळा सुटल्या नंतर होमवर्क तपासण्याच्या बहाण्याने शिक्षकाने विद्यार्थिनीला नको तिथे स्पर्श करत लगट करण्याचा प्रयत्न केला आपल्या सोबत शिक्षकाने केलेल्या कृत्याचा प्रकार विद्यार्थिनीने घरी जाऊन पालकाला सांगितला रविवारी सुट्टी असल्याने शाळा बंद होती त्यामुळे सोमवारला त्या शिक्षकाला याविषयी विचारणा करण्यास पालक गेले आसता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.


पालकांच्या फिर्यादीवरून बिटरगाव पोलीस स्टेशन येथे अल्पवियीन विध्यार्थिनीचं विनयभंग करणाऱ्या शिक्षक शेख जमीर शेख नजीर याच्यावर 75 (1) भा न्या संहिता 8/12 पोकसा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास ठाणेदार संतोष मनवर उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात करत आहेत.
सदर प्रकरणातील आरोपी शिक्षक शेख जमीन शेख नजीर हा फरार झाला असून आरोपीचा कसून शोध घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी.


अशी मागणी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्याकडे औदुंबर वाहन चालक संघटनेने केली आहे.