
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 15 नोव्हेंबर) शहरातील पुसद रोडवरील भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला भीम टायगर सेना चे पत्रकार शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ), तथा मुख्य संपादक जनहित 24 न्यूज, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष उमरखेड तथा कार्यकारी मुख्य संपादक जनहित 24 न्यूज, महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल (सहसंपादक) यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले.सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.

बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला.बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्या ने इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला.


इंग्रजांनी त्याला अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला.