
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (मुख्य कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 11 नोव्हेंबर) महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमरखेड मतदारसंघ हा एससी राखीव सुटल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून तसेच महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून गावोगावी सर्व मतदार क्षेत्रात फिरून प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे.

आज उमरखेड येथे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचारार्थ नाना पटोले यांची जाहीर सभा घेण्यात आली.
यावेळी रामभाऊ देवसरकर,तातू देशमुख, प्रफुल मानकर, सतीश नाईक,संदिप सिंग चव्हाण, राममोहन रेड्डी (आमदार तेलंगणा), डॉ.वजाहात मिर्झा, (माजी आमदार), नागेश पाटील आष्टीकर (खासदार), इनायत तूल्ला जनाब, बाळू पाटील चंद्रे, इत्यादी अनेक मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले त्या सर्वांचा एकच नारा होता की, पंजा निशानीवर बटन दाबून साहेबराव कांबळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे उदगार उपस्थित मान्यवरांनी काढले.

यावेळी मंचावर ॲड.संतोष जैन, नंदकिशोर अग्रवाल, गोपाल अग्रवाल,राजूभैय्या जयस्वाल, प्रणिता कांबळे, मीनाक्षी सावळकर,ॲड. मुटकुळे, भरणे मॅडम, गवळे मॅडम इत्यादी अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.नाना पटोले यांनी सभेला संबोधित करण्यास सुरुवात केली व ते म्हणाले की, साहेबराव कांबळे हे मतदार संघातील अनेक समस्या सोडविण्याकरिता होऊ घातलेल्या विधानसभा क्षेत्रामध्ये उभे राहिले आहे.कांबळे यांचे मतदारसंघासाठी वेगळे व्हिजन तयार केलेले असून मतदारसंघाचा विकास कसा करता येईल हा उद्देश समोर ठेवून निवडणूक क्षेत्रात उतरले आहे. कांबळे हे उच्च शिक्षित असून प्रशासकीय अधिकारी राहून त्यांना सर्व प्रकारची माहिती तसेच मंत्रालयामध्ये विकास कामे कशी खेचून आणावीच याची माहिती कांबळे यांना आहे.


म्हणून आपण सर्वांनी भरपूर मतदान करून त्यांना विजयी करावं अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांना करण्यात आली.अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी या प्रचार सभेत दिली.


चौकट:- मी प्रशासकीय सेवेत असतांना कामे कशी करावीत आणि कसा विकास करावा याची पुरेपूर माहिती मला आहे. ग्रामीण भागातील व बंदी भागातील रस्त्याची अवस्था फार बिकट आहे. मागील दहा वर्षापासून सत्तेत असणाऱ्या भाजपाने या भागामध्ये कोणतीही काम केले नाही हे सर्व काम करण्याचे आमदाराचे कार्य आहे. बंदी भागातील व ग्रामीण भागातील विकास करिता मला एक संधी द्या मी उमरखेड विधानसभा विकसित केल्याशिवाय राहणार नाही सर्व समस्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे – साहेबराव कांबळे (उमेदवार)या प्रचार सभेला उमरखेड महागाव तालुक्यातील अनेक पत्रकार बंधू उपस्थित होते.सभेला हजारों जनसमुदायांनी उपस्थित राहून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांना पसंती दर्शविली उसळला होता.
