
[“शेतकऱ्यांचे असू पुसणारा जो कोणी असेल तोच खरा विकास करू शकते अशी माझी धरण आहे”.]
✒️ सिध्दार्थ दिवेकर (मुख्य कार्यकारी संपादक) मो.9823995466
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014

उमरखेड (दिनांक 6 नोव्हेंबर) महविकास आघाडीचे उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभाचा जनतेचा भरला कुंभ मेळावा. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांताबाई पाटील हे होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळू पाटील चंद्र (माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती) तर रामभाऊ देवसरकर, (जि.प माजी बांधकाम सभापती), उत्तमराव पांडे, खाजाभाई कुरेशी, ॲड.देवराम मुटकुळे, अनिल जाधव, इनायत तुल्ला जनाब, सचिन नाईक, वर्षा निकम, या सर्वांनी साहेबराव कांबळे यांच्या बद्दल त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सांगून साहेबराव कांबळे यांचे हात बळकट करा व त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे मत सर्वांनीच व्यक्त केली.

जनहित 24 न्यूज वर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येतील
प्रचार शुभारंभ मध्ये अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणले की,मी काँग्रेसचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे,मी साहेबराव दत्तराव कांबळे माझी निशाणी आहे ✋🏻पंजा. येत्या 20 तारखेला पंजाच्या बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करशाल अशी अपेक्षा बाळगतो.मागील दोन वर्षापासून तळागाळातल्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्व मतदारसंघ मी पिंजून काढलेला आहे. तळागळाच्या समस्या जाणून घेतले आहे व ते सोडण्याचा प्रयत्न करीत आहे.कुठलीही समस्या असो मी सोडवण्यास तयार आहे. मुलाच्या हाताला काम नाही.



मुले सुशिक्षित एम.ए, पीएचडी आयटीआय झालेली आहेत. इंटरनॅशनल तेहतीस कंपन्या आणल्या व पाच हजार मुलांनी इंटरव्यू दिलेत आणि दोन हजार मुलांना नोकऱ्या मिळाले. हे सरकारचं काम आहे. आमच्या हातात सत्ता नाहीये तरी पण आम्ही जनतेच्या हितासाठी व समाजसेवेसाठी हे काम करत आहे.गावा गावा कडे फिरताना रस्त्याची फार दुरावस्था झाली. काही रस्त्यांची चाळणी झाली आहे बंदी भागात फिरतांना कुठेच पण मी 18 दिवसात फॉरेस्ट ची परवानगी आणून रस्त्याची तयार करण्याची सुरुवात केली. काम करणारे आम्ही आहे. मी प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे मला या गोष्टीची जाण आहे.तालुक्यातील पी एस सी ला डॉक्टर कमी आहेत मेडिसिन कमी आहेत. उमरखेड येथे उपजिल्हा रुग्णालय असून सुद्धा नांदेड यवतमाळ या ठिकाणी पेशंटला रेफर केले जाते.हा कुठला अधिकार आहे.



मागासवर्गीय, गोरगरीब आणि ग्रामीण भागाच्या लोकांना जगण्याचा अधिकार नाही का? आरोग्य सेवांचे समस्या मोठ्या प्रमाणात आहे.तसेच बंदी भागामध्ये शिक्षण विभागाची फार दूर अवस्था झालेली दिसून येत आहे. शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आपल्याला योग्य शिक्षण मिळाले नाही तर आपण कोणत्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही. ही सर्व जबाबदारी शासनाची होती पण शासनाने ही जबाबदारी नाकारलेली आहे. ही सरकार नाकारती सरकार आहे.”शेतकऱ्यांचे असू पुसणारा जो कोणी असेल तोच खरा विकास करू शकते अशी माझी धरण आहे”.बंदी भागातील काही भाग दोन च्या जमिनी आहेत भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून लोकांच्या नावावर या जमिनी नाहीत. कसेल त्याची जमीन आहे शासन निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची ही आमदाराची जबाबदारी आहे.



माझ्याकडे जात नाही पाहत नाही मी एक अधिकारी या नात्याने मला विकास समजतो. माझं व्हिजन आहे या मतदारसंघाचा विकास करायचा आणि मागासवर्गीयांचा कलंक धुऊन काढायचा. माझं व्हिजन आहे उमरखेड मतदारसंघात छोट्या छोट्या इंडस्ट्रीत आणायच्या आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा. पण सत्य शिवाय शान नाही सत्ता असेल तर आपण हे कामे करू शकतो.मतदार बंधू-भगिनींना माझी विनंती आहे मला एकदा पदरात घ्या मी उमरखेड मतदार संघाची कायापट विकास केल्याशिवाय राहणार नाही. असे प्रखर विचार महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव दतराव कांबळे यांनी आज प्रचार शुभारंभ कार्यक्रमांमध्ये आपले मत मांडले.


यावेळी महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
