[उपविभागीय अधिकारी साहेबांच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष्य]

✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड येथे उपविभागीय उमरखेड अधिकारी कार्यालयाने एम एच 42 ए क्यू 7448 मुरमाने भरलेली हायवा पकडली होती.या गाडीचे पावती बुक सुद्धा जप्त करण्यात अली होती.

उपविभागीय कार्यालया जवळ काही कर्मचारी सेटलमेंट करण्याच्या नादात असल्याच्या चर्चा सुरु होती तेथे प्रत्यक्ष गेले असता तिथे काही कर्मचारी निदर्शनात आले. या प्रकरणात उपविभागीय अधिकारी कार्यालयाने काय कारवाई केली.

याची चौकशी करण्याकरीता उपविभागीय अधिकारी मुळे साहेब यांना भ्रमध्वनी द्वारे संपर्क केले असता त्यांनी सांगितले की, दंड लागेल पण दंडात्मक कारवाई होण्याच्या अगोदरच गाडी मात्र फरार करण्यात आली .ही फरार झालेली गाडी कुणाच्या आदेशाने कुणाच्या आदेशाने सोडण्यात अली खरंच सेटलमेंटने फरार झाली किंवा फरार केली कि दंड वसूल करण्यात आला असे अनेक प्रश्न निर्माण झाले.

याची चौकशी उपविगाभागीय अधिकारी मुळे साहेबांनी करायला पाहिजे कारण उमरखेड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गोणेखनिजाची चोरी सुरू आहे आणि याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे आणि त्यातच महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी डायरेक्ट कारवाई करण्याच्या सूचना परवाच दिले असता सूचनेनंतर सुद्धा अशा पद्धतीने गाडी फरार होणे हे आश्चर्य आहे.

दंडात्मक कारवाई होण्याच्या अगोदरच ही गाडी फरार झाली कशी हा शोधाचा विषय आहे.उपविभागीय अधिकारी मुळे साहेब या प्रकरणाची चौकशी करतील का असा सर्व सामान्यांना प्रश्न पडला आहे.