✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
यवतमाळ (दिनांक २५ फेब्रुवारी) नुकतेच १९ फेब्रुवारी ला सर्व देशाचे तसेच मराठी माणसाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सम्पूर्ण देशात तसेच जगात, राज्यात साजरी करण्यात आली होती.

ही शिवजयंती उत्सव साजरी करताना देशात विविध ठिकाणी छत्रपती शिवराय यांची विविध प्रकारचे वाध्य लावून मिरवणूक रॅली काढण्यात आली होती. अशातच व्हायलर व्हिडीओ महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील चंदन नगर खराडी बायपास ची आहेत असे कळले, व्हिडीओ मध्ये रेणुका सोमनाथ पठारे यांचं मंडळ दिसत आहे.

सदर मिरवणूक रॅलीत डीजे (DJ) लावून मिरवणूक काढण्यात आली होती, ही मिरवणूक निघाल्यावर DJ च्या तालावर नाचणाऱ्या लोकांनी मिरवणूक रॅलीत चित्र विचित्र अश्लील हावभाव आणि हावभाव करून मिरवणूक रॅलीला गालबोट लावले.

असे हावभाव करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आत्मसात करून वागणाऱ्या लाखो शिवभक्त, शिवप्रेमीचे मने दुखावली गेली, या कारणामुळे दि.२४ फेब्रुवारी ला यवतमाळ जिल्ह्यातील शिव विचार प्रेमींनी यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

सदर अपमान जनक मिरवणूक काढणाऱ्या आयोजन समिती मधील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सर्व सदस्य आणि मिरवणुकीत विचित्र हातवारे व हावभाव करून नाचणाऱ्या व्यक्तीनं वर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,

तसेच आयोजन करणाऱ्या मंडळाला आजीवन कधीही कोणत्याही महापुरुषांची मिरवणूक रॅली काढण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये.अशी विनोद दोंदल यांनी निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
निवेदन देते वेळी राम घोटेकर, योगेश शेंडे, कुबे प्रसाद, विनोद लोखंडे, डी. बी. कांबळे, कार्तिक लांजेवार इत्यादी शिवभक्त उपस्थित होते.