✍️ शामभाऊ धुळे मुख्य संपादक ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड – (दि.१७ फेब्रुवारी) जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की ती माणवाला जिंकता येत नाही मात्र आपला आत्मविश्वास जर दृढ असेल तर अशक्य गोष्ट देखील शक्य असल्याचे मत भगवती हॉस्पीटलचे संचालक डॉ अंकुश देवसरकर यांनी व्यक्त केले शिवजयंती महोत्सवा निमित्य इनिव्हरसल इंग्लीस मेडियम स्कूल मध्ये आयोजीत स्पर्धात्मक परिक्षा मार्गदर्शन व राज्यसेवा स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शक म्हणून रविवार दिनांक १७ रोजी बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड संतोष जैन हे होते,

तर एकनाथ पावडे ( विक्रीकर उपायुक्त ) , प्रा डॉ . अनिल काळबांडे , प्रा अमोल कवाणे , प्रा विजय गुजरे , सुरेश कदम , अनिल नरवाडे , आनंद महाराज उपस्थित होते.

पुढे बोलतांना डॉ देवसरकर म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा च्या माध्यमातून मार्गदर्शन व्हावे येथील विद्यार्थी हे उच्च पदस्थ अधिकारी झाले पाहिजेत त्यामुळे प्रत्येकांनी मोठे स्वप्न पाहून ते साकार करावयास हवे असा आशावाद व्यक्त करून आपल्यात आत्मविश्वास असेल तर MPSC , UPSC IPS होऊ शकता आणि देशाची, समाजाची सेवा करण्याची संधी सहज मिळवू शकता.

स्वतःचा आत्मविश्वास व योग्य ती नियोजन केलं तर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकतो हे करत असतात मी स्वतःच्या मेंटल स्टॅबिलिटी ठेवणे गरजेचे आहे खचून न जाता मेहनत करायचे मानसिक दिसल्या स्ट्रॉंग असणे गरजेचे आहे असे मत अंकुश देवसरकर यांनी मांडले .

यावेळी बारावी पदवीधर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल काळबांडे संचलन प्रविण सुर्यवंशी तर आभार अँड शिवाजीराव वानखेडे यांनी मांडले . कार्यक्रम झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.

चौकट : आम्ही घडलो तुम्हीही घडा :एकनाथराव पावडे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन आपले अस्तित्व निर्माण करू शकतो नोकरी मिळवणे उद्देश नसून काहीतरी करण्याची जिद्द विद्यार्थ्यांमध्ये असणे गरजेचे आहे असून शिक्षण हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असे मत विक्रीकर उपाआयुक्त यवतमाळ एकनाथराव पाटील यांनी मांडले.