
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक ११ फेब्रुवारी) शहरातील उप कार्यकारी अभियंता कार्यालय उमरखेड येथील कार्यरत असलेले हेमंत कांबळे (सहाय्यक अभियंता) उमरखेड शहर यांची मी दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी माझ्या घराजवळील झाडाला जिवंत विद्युत वाहिन्या एकत्रित बांधून बांधकाम होत असलेल्या घरासाठी व्यवस्था करून दिली होती.

तब्बल दोन महिने विद्युत तार बांधून असल्याकारणाने मी कुठलीही अनुचित घटना होऊ नये, जीवितहानी होऊ नये म्हणून मी वारंवार कार्यालयामध्ये जाऊन भेट दिली. पण कांबळे यांनी मला उद्धटपणे बोलून अपमानित वागणूक दिली. म्हणून मी व्यस्थीत होऊन आपल्या कार्यालयात तक्रार दिली म्हणून अतिशय द्वेषयुक्त बुद्धीने प्रेरित होऊन माझे नावे असणारे विद्युत मीटर लाईन पूर्णतः बंद केली.

चौकट:- “छोटेखानी हॉटेल व्यवसायावर माझे व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असतो. पण हॉटेलची लाईन बंद असल्यामुळे आज माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे” – शामभाऊ धुळे (त्रस्त वीज ग्राहक)
त्यांच्यासोबत सहकारी संबंधित कर्मचारी होते त्यांनी बिल थकीत कारण पुढे करून जाणीवपूर्वक मला अंधाराचा त्रास होईल म्हणून माझे विद्युत मीटर लाईन बंद करून सुडाची कृती केले व व माझ्यावर अन्याय केला मी दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी विद्युत बिल भरणा करून देखील लाईन पूर्वतव सुरू केली नसून तू तक्रार केली ना मंग यवतमाळ ला जाऊन लाईन जोडून घे…! असे बेजबाबदार उद्धटपणे बोलून मला अपमानित वागणूक दिली.

म्हणून संबंधित सहाय्यक अभियंता कांबळे व दोषी कर्मचारी यांच्यावर कारवाही करून मला न्याय द्यावा आणि माझ्या होटेलची लाईट जोडणी करून द्यावी.

८ दिवसात कारवाई न झाल्यास मला आपल्या कार्यालयासमोर उपोषण करावे लागेल. अशी तक्रार शामभाऊ धुळे त्रस्त विज ग्राहक यांनी केली आहे.