
[उपोषणकर्त्यांना गटविकास अधिकारी बोलावतात स्वतःच्या कक्षात]
माहूर प्रतिनिधी ✍️समाधान कांबळे
माहूर तालुक्यातील सेलू ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक देवानंद फुलके यांना अर्ज आणि विनंती करण्यात आले असताना उपोषण करते अतुल पांडुरंग गावंडे यांनी आमरण उपोषणसाठी तहसील कार्यालय माहूर समोर बसले,

असता आज त्यांचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकुती खालावत आहे, उपोषणकर्ते अतुल गावंडे यांच्या आजोबाची मालमत्ता अतुल गावंडे यांच्या नावावर नमुना नंबर आठ ला नोंद घेण्यास ग्रामसेवक देवानंद फुलके हे टाळाटाळ करत आहेत .

म्हणून मी आमरण उपोषणास बसलेलो आहे.असे उपोषणकर्त्याचे म्हणणे होते. नमुना नंबर आठ च्या रजिस्टर मध्ये खोडाखाड करणाऱ्यांविरुद्ध कार्यावाही करून गुन्हा दाखल करावे असे उपोषणकर्त्याचे मागणी आहे.
गेल्या तीन दिवसापासून मी उपोषणास बसून आहे परंतु अद्यापही कोणीही भेट दिलेले नाही असे उपोषणकर्ते अतुल पांडुरंग गावंडे यांनी सांगितले.