(उमरखेड वाहतूक शाखा फक्त वाहन चालकांकडून सक्त वसुली करण्यास मग्न)

(मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही)
यवतमाळ (दिनांक ३ फेब्रुवारी) जिल्ह्यातील उमरखेड शहरामध्ये बेसुमार वाहतूक झालेली आढळून येत आहे.

उमरखेड शहरातील मुख्य चौक माहेश्वरी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, नाग चौक तसेच स्टेट बँक परिसर आणि बस स्टॉप समोर प्रचंड वाहनाची गर्दी होत असून खाजगी वाहने रोडवर उभी ठेवल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चौकट:- उमरखेड वाहतूक शाखेचे वाहनावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. पण वाहतूक शाखेचे कर्मचारी शहरात न राहता उमरखेड तालुक्याच्या चारही बाजूच्या रस्त्यावर फक्त वाहन चालकाकडून जबरीने वसुली करण्याकरिता ड्युटी करीत असतांना दिसून येतात पण सर्व नियम धाब्यावर ठेवून. – शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ) यामुळे शहरातील वाहतूक सेवा ही ठप्प झाली आहे.
कोणताही कर्मचारी शहरातील चौकामध्ये दिसून येत नाही त्यामुळे शहरात वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले दिसत आहे.याकडे लोकप्रतिनिधी आणि यवतमाळ वाहतूक शाखा अधीक्षक यांनी लक्ष देऊन उमरखेड शहरातील वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

अशी माहिती भीम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.