
(अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित यवतमाळ यांना लेखी तक्रार सदर)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड:- (दिनांक 1 फेब्रुवारी) येथील विज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता श्री. काबंळे व त्याचे सहकारी यानी अर्थिक देवान घेवान करून दुसऱ्याच्या घरावरचा विज वाहीन्या माझ्या घरातील झाडाला अनेक महिन्यापासून बांधल्या असून ती काढण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे यांची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी असे तक्रार निवेदनात म्हटले आहे.

उमरखेड येथील विज वितरणचे सहाय्यक अभियंता श्री. कांबळे व त्याचे सहकारी यांनी इंदिरा नगरातील जिवंत विज वाहिन्या माझ्या घराजवळील झाडाला बांधून ठेवल्या आहेत.

या वाहिन्याला नागरिकांचा स्पर्श झाल्यास जिवितहानी व इतर काही दुर्घटना घडल्यास यवतमाळ, सहाय्यक अभियंता, व उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी उमरखेड हेच जबरदारी राहीतील.

तसेच या अगोदर कार्यालयामध्ये कार्यालयीन बुकावर तक्रार नोंद रितसर करून सुध्दा जिवंत विज वाहीण्या आजपर्यंत काढल्या नाहीत.

तेव्हा सदर प्रकरणी चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात यावी.अशी तक्रार अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित यवतमाळ यांना लेखी तक्रार भीम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे यांनी दाखल केली आहे.