
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड :- (दिनांक १३ जानेवारी) महाराष्ट्रात १८४८ रोजी स्त्री शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवणारे शिक्षणाची क्रांती घडविणारे पहिले शिक्षक महात्मा फुले व पहिली महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी माळी समाज यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर फुले दापत्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळावा या साठी चळवळ उभी होऊन त्यासाठी अनेक आंदोलने, अनेक पद्धतीच्या मागण्या केलेल्या आहे.महाराष्ट्रत नव्हे तर देशात शिक्षणाची सर्वात मोठी क्रांती घडविणारे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता संविधानिक मागनि आम्ही रितसर निवेदन देऊन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असून त्यांनी तात्काळ केंद्राकडे या साठि पाठपुरावा कराव. महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या संघटने कडून निवेदन देण्यात येत आहे.

आज त्यांच्या शिक्षण क्रांतीमुळे महाराष्ट्रभर तसेच देशभर महिला व मुली आज मोठ्या सन्मानाने शिक्षण घेऊन देशातील सर्वात मोठे संविधानिक पद राष्ट्रपती पदावर सुद्धा आज मोठ्या सन्मानाने व मोठ्या जिद्दीने महिला सांभाळताना दिसत आहे.
अनेक क्षेत्रात उल्लेखनीय म्हणजे भारताच्या सीमेवर असणारे बी. एस. एफ सारख्या सैन्य दलात महिला आहेत. या बरोबर भारताच्या तिन्ही सर्वात मोठ्या सैन्य दलात आज मोठ्यासन्मानाने महिला आपले कर्तव्य निभक्त आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात पुणे येथील शनिवार वाड्यात १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मूहुर्तमेढ रोवली.

त्यामुळेअशा थोर महात्म्यांना येत्या २६ जानेवारी २०२५ ला भारताचा सर्वात मोठा सन्मान भारतरत्न पुरस्कार हा फुले दांपत्यांना मिळावा याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या माध्यमातून दिले.

यावेळी रवींद्र अनखुळे, कुणाल मत्ते, गणेश खंदारे, रघुनाथ खंदारे, जय अनखुळे, राहुल मोहितवार, श्याम चेके, सय्यद माजीद, शैलेश अनखुळे,गणेश खंदारे , आनंदा मत्ते सुभाष मत्ते, किशोर बोरगडे, गणेश अण खुळे , विनोद खंदारे, अनिल लाव्हरे आदी उपस्थित होते.