
✍🏻 शामभाऊ(मुख्य संपादक)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
पुणे (दिनांक ११ जानेवारी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पिंपरी चिंचवड शहर पत्रकार हल्लाविरुद्ध कृती समितीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार सोहळा मराठी पत्रकार दिनी 6 जानेवारी निगडीच्या ग.दि. माडगूळकर सभागृहात पार पडला.

या कार्यक्रमात रहिवाशी उमरखेड येथील समीर मगरे यवतमाळ जिल्हा दैनिक तरुण भारत प्रतिनिधी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

व्यासपीठावर पद्मश्री गिरीश प्रभुणे संपादक सरिता कौशिक अभिनेता किरण माने आमदार अमित गोरखे सचिन जवळ कोटे, उद्योजक संजय कलाटे आदीउपस्थित होते.

यावेळी संवादक किरण माने यांनी पत्रकारितेत येणाऱ्या अडचणी दडपण व जबाबदारी यावर आधारित विविध विषयावर चर्चा केली.

ग्रामीण दुर्गम भागातील शहरातील अशा वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकाराचा सन्मान करण्यात आला.