
[आंबेडकरवादी, संविधान प्रेमी यांना केले आव्हान]
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक २ जानेवारी) कोरेगाव भीमा इथे १ जानेवारी १८१८ मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली होती. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले होते.

शूरवीर महार समाजातील सैन्यांच्या पराक्रमामुळे ब्रिटीशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. ही लढाई महार समाजाच्या आत्मसन्मानासाठी आणि गळ्यातील मडकं आणि कमरेचे झाडू काढण्यासाठी होते.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दादासाहेब शेळके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच बाजूलाच भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाची प्रतिकृतीलाही पुष्पहार अर्पण करून पाचशे शूरवीर महार यांना मानवंदना दिली.


५०० महार शूरवीरांनी २० हजार पेशव्यांना चराचर कापले. आणि पेशवाई संपविण्याचे काम केले.

पण आजही पेशवाई ही परभणी येथील प्रकरण असो संविधानाची विटंबना असो बाबासाहेब आंबेडकराचा अपमान करणे असो, समाजावर वाढते अन्याय अत्याचार असो अशा प्रकारे पेशवाई फणावर काढत आहे. तो फना जागीच ठेचण्याकरिता आंबेडकरवादी, संविधान प्रेमी, यांनी सामाजिक राजकीय लढाई लढण्याकरिता तयार राहावं..!


असे आव्हान यावेळी भीम टायगर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, संविधान रक्षक दादासाहेब शेळके यांनी केले.
यावेळी भीम टायगर सेना जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे, करणदादा भरणे जिल्हा उपप्रमुख, सिद्धार्थ दिवेकर पत्रकार तथा शहराध्यक्ष भीम टायगर सेना, कैलास कदम तालुका अध्यक्ष भिम टायगर सेना इत्यादी अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.