
[आत्मसन्मानासाठी व्यवस्थेविरुद्ध पेटून उठलेल्या शौर्याचे हे प्रतीक]
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड:- १ जानेवारी १८१८ भीमा कोरेगाव येथे झालेली लढाई ही समतेसाठी आत्मसन्मानासाठी व स्वाभिमानासाठी लढून गुलामानां स्वातंत्र्याचे व मानव मुक्तीचे नवे आयाम देणारी ही लढाई होती.५०० महार सैनिका विरुद्ध २८ हजार पेशव्यांच्या सैनिकांना लढाईत पराभव पत्करावा लागला. ही लढाई म्हणजे जातीवादी व्यवस्थे विरुद्ध आत्मसन्मानासाठी पेटून उठलेल्या क्रांतीचे व शौर्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.अनिल काळबांडे यांनी केले.

ते भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित मानवंदना ह्या कार्यक्रमात बोलत होते.या कार्यक्रमाचे आयोजन समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व बुद्धिस्ट सेवानिवृत्त संघटना यांच्या वतीने ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष गंगाधर कांबळे होते.

सुरुवातीला मेजर राजसाहेब पंडित यांच्या मार्गदर्शनात समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना देऊन पुष्पचक्रअर्पण करण्यात आले.
यानंतर भीमा गोरेगाव ची शौर्यगाथा सांगण्यात आली प्रा.धनराज तायडे, प्रा.भगत, आत्माराम हापसे व माजी आमदार विजयराव खडसे यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली.

भीमा कोरेगाव ची लढाई ही पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या गावच्या भीमा नदीच्या किनारी ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई एक जानेवारी इसवी सन १८१८ रोजी इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनी व पेशवाई यांच्यात झाली ब्रिटिशांच्या बाजूने ८२४ सैनिक होते त्याचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉटन करीत होते.
इंग्रजांच्या सैनिकात बॉम्बे नेटिव्ह लाईट तुकडीचे सुमारे ५०० महार सैनिक, काही युरोपियन व काही इतर सैनिक होते.पेशव्यांच्या बाजूने २८ हजार सैनिक होते. जाचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होते, पुढे बोलताना प्रा.काळबांडे सर म्हणाले पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणात होत होते महार, मांग व ईतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात होती.

ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध आम्हाला लढाईत सैनिक म्हणून संधी द्या व जातीय भेदाभेद नष्ट करा अशी मागणी पेशव्यांना केली. ती मागणी पेशव्यांनी अमान्य केली व महारानां अपमानित केले. ह्याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी इंग्रजांच्या बाजूने पेशव्यांच्या विरोधात लढले आणि विजयी झाले.या लढाईत पेशवाई हरली आणि पेशवाईचा अस्त झाला.

या कार्यक्रमाला सुमेध बोधी विहार समितीचे कार्याध्यक्ष संतोष निथळे, राहुल काळबांडे , वीरेंद्र खंदारे, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष भीम टायगर सेना, गजानन दामोदर, सिद्धार्थ बरडे, शामभाऊ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष, आर,जी. खंदारे, सेवानिवृत्त संघटनेचे सचिव भीमरावजी आठवले व्हि.टी मुनेश्वर, बाणा सावतकर, दत्ता मुनेश्वर, एडवोकेट शंकर मुनेश्वर , दादाराव आठवले, दिगंबर श्रवले ,प्रकाश मनवर, अर्जुन बर्डे, दुधाडे साहेब या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव काळबांडे यांनी केले व या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभेचे धम्मदीप काळबांडे यांनी केले व आभार बौद्ध महासभेचे तालुका उपाध्यक्ष संभा मुनेश्वर यांनी मानले.या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व समता सैनिक दलाचे महिला व पुरुष कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या प्रमाणात हजर होते.

चौकट :- ७५ फूट विजयी स्तंभ कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर इंग्रजांनी सूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फुट विजयी स्तंभ उभारून त्यावर २० शहीद व तीन जखमी सैनिकांचे नांव कोरीव स्तंभावर लिहिलेले आहे.

“one of the Triumphs of the British Army of the Earth ” पृथ्वीवरील ब्रिटिश सैनिकांच्या विजयामधील एक मार सैनिकांच्या स्मरणार्थयेथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी देश विदेशातील प्रत्येक जाती-धर्मातील हजारो अनुयायी भीमसैनिक बौद्ध बांधव लाखोंच्या संख्येत भीमा कोरेगावला असतात.

बौद्ध मूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा विजय स्तंभाच्या समोर ठेवून शहीद सैनिकांना मानवंदना दिली जाते.