✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✒️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)

हदगाव (दि.२६ डिसेंबर) तीर्थक्षेत्र म्हणून राज्य शासनाने घोषित केलेल्या हदगाव येथील तामसा रोडवरील भदंत टेकडी येथे ३० फूट उंचीची बुद्धमूर्ती स्थापना भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन नागेश पाटील आष्टीकर (माजी आमदार) यांच्या हस्ते दिनांक २५/१२/२०२४ रोजी सकाळी दु.१ वाजता संपन्न करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र कदम (माजी सरपंच धानोरा/टा.), जोगेंद्र नरवाडे कामारीकर (मा. सरपंच), सिध्दार्थ दिवेकर पत्रकार उमरखेड, शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


सदर कार्यक्रमाचे आयोजन बौद्धजन महासंघीती वतीने करण्यात आला होता.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या समितीचे पदाधिकारी महाराष्ट्राचे ख्यातनाम भीम शाहीर माधवराव वाढवे, राष्ट्रपाल सावतकर,बबन भालेराव, वामनराव घंगाळे, संदीप दवणे इत्यादी अनेक जणांनी परिश्रम घेतले होते.

या कार्यक्रमाला हदगांव उमरखेड तालुक्यातील अनेक बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.