✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)


उमरखेड (दिनांक १६ डिसेंबर) भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता.

सोमवारच्या यवतमाळ जिल्ह्यात बंद साठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने ठिकठिकाणी बंद संदर्भात तसेच उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले होते.
या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून उमरखेड तसेच यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळला गेला. परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधान प्रतीकृतिच्या शिल्पाची मोडतोड करून विटंबना करण्यात आली होती.



या निषेधार्थ परभणी येथे झालेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जमुळे विधी अभ्यासक्रमाच्या तृतीत वर्षाचे शिक्षण घेत असलेला आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. तसेच अनेक महिला आंदोलकांना गंभीर दुखापत करण्यात आली होती. पोलिसांच्या या पाशवी मानसिकतेच्या विरूद्ध उमरखेड बंदचे आवाहन करण्यात आले होते.

या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्व व्यवहार बंद होते.संविधानवादी जनतेच्या वतीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या द्वारे मा. महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे १) शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या पो. निरीक्षका विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना कडक शासन करण्यात यावे.
२)शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या सोपान पवार यास मनुष्य वधाच्या गुन्ह्याचा सहआरोपी करण्यात यावा.
३) सोपान पवार याचे नावे असलेली स्थावर व जंगम मालमत्ता महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आपल्या ताब्यात घ्यावी.
अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, ता. अध्यक्ष गौतम नवसागरे, तीवडी शाखा अध्यक्ष बबलू सूर्यवंशी, राजू आगीरे, सचिन खंदारे,


आजाद समाज पार्टीचे शहराध्यक्ष प्रफुल दिवेकर, ता. अध्यक्ष देवानंद पाईकराव, मार्शल विनोद बरडे, संगम चिंचोलीचे उपसरपंच बंडू चिंचोलकर, रिपाईचे ता. अध्यक्ष अनिल बर्डे, शहराध्यक्ष सिद्धार्थ बर्डे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) चे जिल्हाप्रवक्ता शाहरुख पठाण,
सामाजिक कार्यकर्ते अरविंद धोंगडे, किरण दवणे, गजानन नवसागरे, दै. विश्वजगतचे ता. प्रतिनिधी राजेश खंदारे यांच्यासह संस्कार दिवेकर, अभिजीत दिवेकर, सचिन दिवेकर, आर्यन दिवेकर, राज दिवेकर, योगेश दिवेकर, प्रथमेश दिवेकर, सिद्धांत दिवेकर तसेच उमरखेड तालुक्यातील शेकडो संविधान प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.