

🖊️ शाम भाऊ धुळे (मुख्य संपादक)
🖊️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)
तालुका प्रतिनिधी माहूर : – समाधान कांबळे
परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रतिकात्मक संविधानाचा अवमान केल्याचा माहूर येथे घटनेचे पडसाद उमटले.
माहूर येथील विविध संघटनाकडून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी माहूर येथील संविधान प्रेमी आणि फुले शाहू आंबेडकर प्रेमी यांनी परभणी घटनेचा जाहीर निषेध करत माहूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज दिनांक 13 रोजी सकाळी 11 वाजता माहूर तहसीलचे तहसीलचे नायब तहसीलदार कैलास जेठे आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवप्रकाश मुळे यांना शांततेत निवेदन देण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ता मनोज किर्तने यांनी मनोगतात सांगितले की,ज्या संविधानाने भारत देशाला सर्वोत्तम अशी लोकशाही दिली. ज्या संवैधानिक अधिकारामुळे आज देशातील एस सी, एस टी, ओबीसी आणि महिला प्रगती करू शकले त्या संविधानाचा वारंवार होत असलेला अपमान लोकशाही साठी घातक आहे.

तेढ निर्माण होईल अश्या विषारी प्रचारामुळे जातीय धार्मिक सलोखा आणि देशाच्या सार्वभौमत्वाला कधी नव्हे एवढा धोका निर्माण झाला आहे. देशात शांतता प्रस्थापित करण्यावर आणि अश्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने योग्य ती काळजी घ्यावी. आंदोलकांवर केलेल्या केसेस मागे घ्याव्यात. पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन त्वरित थांबवा.

संविधान प्रतिकृतीची नासधूस, विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कार्यवाही करा. ही मागणी केली. काही मान्यवरांची समयोचीत भाषणे झाली. निवेदनावर -केशव भगत, सिद्धार्थ तामगाडगे, मनोज कीर्तने,गोविंदराव मगरे पाटील, रेणुकादास वानखेडे,डॉ सत्यम गायकवाड, दत्ता कांबळे,

विक्रांत भगत, दीपक कांबळे मुन्ना कांबळे, कनिष्क वानखेडे, भिम टायगर सेना संपर्कप्रमुख समाधान कांबळे, भिम टायगर सेना तालुका अध्यक्ष प्रवीण बर्डे, राहुल नरवाडे, शंकर कांबळे, जॉन बर्डे,राजू मगरेअमृत जगताप, विक्रम जगताप,सचिन कांबळे, पवन लांडगे, बाळू कांबळे, रणधीर कांबळे, मनोज राऊत, राजरत्न खाडे, रवींद्र, आकाश,

रामदास बर्डे, ओंकार शिंदे,देवानंद भालेराव, शेख रफिक, सईद अली, नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी, एम आय एम तालुका अध्यक्ष सज्जाद आजीस,फैजल खान,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या घटेनच्या निषेधासाठी – माहूर नगर पंचायतचे नगरसेवक सागर महामुने, जेष्ठ पत्रकार विजय आमले,

नंदकुमार जोशी, जयकुमार अडकीने, आदी पक्षाच्या नेते मंडळी आणि सामाजिक संघटनाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

या वेळी मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून-या ठिकाणी सहायक पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण, परमेश्वर कणकावार, गेडाम,गजानन जाधव, गजानन चौधरी,सुरेश भगत आदी पोलीस स्टेशन चे कर्मचारी उपस्थित होते.