✍️शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
✍️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)
✍️समाधान कांबळे श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी)

माहूर (दिनांक १० डिसेंबर) भाजपचे महाराष्ट्र राज्य मराठवाडा विभाग महामंत्री संजय केनेकर माहूरगडावर श्री रेणुका म ातेचे दर्शनाकरिता सहपरिवार आले असता माहूर येथील विश्रामगृह येथे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे सत्कार करून त्यांचे उपस्थित पत्रकारांद्वारे राजकीय मत घेण्यात आले.

महाराष्ट्रातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी पॅटर्न संपूर्ण भारतात महाविकास आघाडीची मागणी करत आहे. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले की जेव्हा लोकसभेला ईव्हीएम वर मतदान झाले तेव्हा महाविकास आघाडीला काही हरकत नव्हते परंतु झालेल्या विधानसभेला महाविकास आघाडीचा पराभवानंतर मात्र ईव्हीएम खराब, असे काहीही झाले नसून जनतेचा कौल महायुतीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत झाल्यामुळे महाविकास आघाडीला पचनी पडले नाही असे त्यांनी मत मांडले.

व हिवाळी अधिवेशनाच्या आधी संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होईल का? असे विचारले असता महायुती सरकार म धील तिन्ही पक्षांच्या संगणमताने निर्णय घेऊन कॅबिनेट मंत्रीपदे देऊन राज्यमंत्री पद सुद्धा वरिष्ठांच्या निर्णयाने घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी तेथे उपस्थित भाजपाचे कार्यकर्ते व तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे संपूर्ण माहूर तालुका पदाधिकारी उपस्थित होते.