📍शामभाऊ धुळे मुख्य संपादक📍सिद्धार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)✍️समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी)

माहुर :- (दिनांक 9 डिसेंबर) महामार्ग क्रमांक 361 ए धनोडा ते कोठारी या महामार्गाचे कोठारी ते लांजी बायपास पर्यंत पूर्ण झाले असून याच महामार्गावर माहूर पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंबायत फाट्यावरील महामार्ग क्रमांक 361चे काम गेल्या दोन वर्षापासून पूर्ण झाले असून लिंबायत गावातून येणारा जोड रस्ता महामार्गाच्या रस्त्यापासून सुमारे दहा फुटांनी खाली गेला असून जोड रस्त्याचे काम संबंधित कंट्रक्शन कंपनीने करून देणे

बंधनकारक असताना सुद्धा कंपनीने आपला पसारा गुंडाळून पळाल्यामुळे गावातील नागरिकांना महामार्गाच्या रस्त्यावर जात असताना तारेवरची कसरत करावी लागत असून जोड रस्त्यावर थातूरमातूर पद्धतीने मुरूम टाकून दिल्यामुळे पूर्ण मुरमाचे दगड वर आल्या असल्यामुळे कित्येक जण गाडी घसरून पडून जखमी झाले व कित्येकांचे एक्सीडेंट मध्ये हात पाय गमावे लागले आहे.

हे अत्यंत बाब निंदनीय असून जोड रस्त्याचे काम आपल्या स्तरावरून संबधित विभागाला सूचना देऊन जोड रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून द्या अशा आशयाचे निवेदन माहूर तहसीलदार यांना गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले असून

त्यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बरडे, उपसरपंच सुनील चुंगडे, आनंद चुंगडे,अरुण जाधव, संजय इंगोले, सतीश शिंदे, पंडित जाधव, सुरेंद्र मोरे, बाबाराव दवणे, गणेश राऊत, उपस्थित होते व निवेदनावर 100 च्या वर लोकांच्या सह्या असून रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत पूर्ण करून न दिल्यास दिनांक 13 डिसेंबर रोजी किनवट माहूर रोड वरील लिंबायत फाट्यावर चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.