🖊️ शामभाऊ धुळे मुख्य संपादक मो.9823142014
🖊️ सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड :- (दिनांक ७ डिसेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, त्यांचा लढा, त्यांनी लिहलेले संविधान, त्यांनी पेरलेली मानवी विकासाची मूल्य ही सर्वासाठीच होती म्हणून समाजाने एकसंघ राहून सर्वासाठी बाबासाहेब ही भूमिका घेऊन समाजास कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांनी केले.


ते स्थानिक बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका जवळ आयोजित महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा तालूका अध्यक्ष धम्मदीप काळबांडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्रो डॉ अनिल काळबांडे, उद्धव गायकवाड, संभाजी मुनेश्वर, संभाजी दवणे यांनी विचार व्यक्त केले.

सुरवातीला मेजर राजेसाहेब पंडित यांनी समता सैनिक दला तर्फे मानवंदना दिली तर आत्माराम हापसे यांनी उपस्थितांना त्रिरणासह पंचशिल प्रदान केले . डॉ काळबांडे यांनी, बाबासाहेबांचे विचार समाजासाठी आजही दिशादर्शक असून तेच सर्वाच्या उद्धाराचा मार्ग असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या धैयधोरणा नुसार ‘ EMV हटाव देशबचाब ‘या मोहिमेसाठी डि के दामोधर यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली.

या अभिवादन सभेला प्रा. नंदकिशोर भगत, अर्जुन बर्डे, भीमराव आठवले, विलास वाळके ‘ चंद्रप्रकाश मुनेश्वर, संभाजी बहादुरे , सदाशिव दुधाडे सिंधुताई पंडित, भीमराव सोनुले, संतोष नितळे, उत्तम शिंगणकर, दिगंबर श्रवले , बाणा सावतकर भीमराव रोकडे , दे मा काळबांडे, अॅड शंकर मुनेश्वर , दिपक कांबळे , किशोर तिवारी, डॉ अविनाश खंदारे, अभिजित पाईकराव यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल , विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटना तथा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव काळबांडे यांनी तर आभार संभाजी मुनेश्वर यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.