
✒️शामभाऊ धुळे मुख्य संपादक मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 4 डिसेंबर) उमरखेड कृषी कार्यालय येथे दिर्घकाळ वास्तव्य झाल्यामुळे उत्तम जानकर यांची तात्काळ बदली आणि कोणतीही प्रशासकीय कारवाई होत नसल्यामुळे अमर उपोषण बसणार – शाम धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ यांनी निवेदनात म्हटले आहे.


श्री. उत्तम जानकर (कृषी मंडळ अधिकारी), तालुका कृषी कार्यालय, उमरखेड हे नियमाबाह्य दिर्घ वास्तव्यापासुन एकाच कार्यालयात सेवेत कार्यरत आहेत.परंतु कर्मचारी सेवा व शिस्त मार्गदर्शक तत्वानुसार त्यांची इतरत्र प्रशासकीय बदली का झालेली नाही.

त्याची चौकशी व्हावी व इतरत्र बदली तात्काळ करावी.अशा आशयाची तक्रार आपले कार्यालयास दिलेली असुन सुध्दा जाणीवपुर्वक सदर गंभीर प्रकरणी अद्याप दखल घेतलेली नाही म्हणुन मी व्यथित होवून दि. १६/१२/२०२४ वार सोमवार रोजी उपविभागीय अधिकारी, उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसत आहे.

करीता माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव सादर.या प्रकरणी होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

तक्रारकर्ते शाम माधव धुळे असा इशाराही निवेदनामध्ये केली.
तसेच प्रतिलिपी म्हणून१) मा. विभागीय आयुक्त, विभागीय कार्यालय, अमरावती.२) मा. जिल्हाधिकारी साहेब, यवतमाळ.३) मा. जिल्हा पोलिस अधिक्षक साहेब, यवतमाळ.

४) मा. उपविभागीय अधिकारी (महसुल), उमरखेड.५) मा. उपविभागीय पोलिस अधिकारी, उमरखेड.६) मा. तालुका कृषी अधिकारी, उमरखेड. यांना माहितीस्तव सविनय सादर इत्यादी अधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आलेले आहे.