
✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✍️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
✍️ समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)

माहूर (दिनांक 4 डिसेंबर) तालुक्यातील मौजे मालवडा गावात एका वाहनाच्या धडकेत वानर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना बघताच गावातील नागरिक गजानन बेहरे व गणेश पाईकराव यांनी MH 29 हेल्पिंग हॅण्ड्स वाईल्ड ऍडव्हेंचर अँड नेचर क्लबच्या माहूरगड शाखेचे जिल्हाध्यक्ष मोहनजी मुर्खे यांना कळवले.

माहिती मिळताच मोहनजी मुर्खे यांच्या निर्देशानुसार रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली.रेस्क्यू टीममध्ये उपस्थित सर्पमित्र भीमाशंकर सूर्यवंशी आणि मंगेश जोगदंड यांनी तातडीने वानरावर प्रथमोपचार केले. त्यानंतर त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मा. रोहित जाधव यांना घटनेची माहिती दिली. वनपाल अली सर, वनपाल माने सर, आणि वनपाल वाघमारे सर यांनी घटनास्थळी येऊन वानराची तपासणी केली. वानरावर उपचार केल्यानंतर त्याला माहूरच्या प्रादेशिक जंगलात सुरक्षित सोडण्यात आले.

गेल्या दोन महिन्यांत चार अपघातग्रस्त वानरांवर MH 29 क्लबच्या टीमने यशस्वी उपचार करून त्यांना जंगलात सोडले आहे.

टीमने वाहनचालकांना वन्यजीवांना बघून जपून वाहने चालवण्याचे आवाहन केले आहे.जर कुठेही जखमी वन्यजीव किंवा साप आढळल्यास, MH 29 हेल्पिंग हॅण्ड्स वाईल्ड ऍडव्हेंचर अँड नेचर क्लबच्या यवतमाळ हेल्पलाइन क्रमांक 9850577616 किंवा माहूरगड टोल-फ्री क्रमांक 9922363538 वर त्वरित संपर्क साधावा.
