✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✍️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) रिपोर्टर मो.9823995466

उमरखेड (दिनांक 26 नोव्हेंबर)एसटी आगार येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जगातील सर्वात मोठी आणि महान लोकशाही म्हणून भारताकडे आदराने पाहिले जाते. त्याचे सर्व श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान भारतीयांचेच आहे. जोपर्यंत आपल्याकडे सुशिक्षित आणि सुसंस्कारित मानवधन तयार होत नाही, तोपर्यंत याच संविधानाचा वापर आपल्या सोयीप्रमाणे लावला जाईल.

विवेक, त्याग, प्रामाणिकपणा, निष्ठा, विश्वास, प्रेम, जिव्हाळा याने युक्त असे मानवधनच लोकशाहीचा उत्तम उपयोग घडवून आणू शकेल.स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ,धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि समाजवाद या मूल्यांची जोपासना करत भारतीय नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार व कर्तव्य ज्या दिवशी मिळाले तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. हा दिवस आपणविविध धर्म, संप्रदाय, भाषा, चालिरीती असतानाही, सर्वांमध्ये एकात्मता उत्पन्न करणारे असे देशाचे संविधान आहे.

या संविधानाने आपल्या देशात अद्वितीयरितीने लोकशाही शासन दृढमूल केले आहे. म्हणून त्याचे आपल्या जीवनात महत्व आहे.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग प्रतिभेची ते साक्ष आहे यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.


डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान दिनाचा विजय असो असा जयघोष करण्यात आला.

या कार्यक्रमास आगार व्यवस्थापक मा. प्रामोदीनी ताई किनाके प्रकाश भादाडे, राहुल गायकवाड, चेतन जाधव,भारत वाठोरे, राजू दुधाटे, रोकडे, दत्तात्रेय उगले श्री सुनील गंगावणे, लक्ष्मण रणमले, गजानन शिंगणकर, रितेश राठोड, धुळे पंडित आदी कर्मचारी उपस्थित होते.
