
[उमरखेड शहरामध्ये उसळला जनसागर]
✒️ शामभाऊ धुळे मुख्य संपादक मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) मो.9823995466


उमरखेड (दिनांक 15 नोव्हेंबर) भारताचे केंद्रीय गृहमंत्री प्रथम भारतीय जनता पक्षाचे किंगमेकर अमित शहा यांचे उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी तथा मित्र पक्षाची अधिकृत उमेदवार किसनराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे स्टार प्रचारक अमित शहा अमित भाई यांची जाहीर जनसभा उमरखेड आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 12 वाजता जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानात झाली असून या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे 3 वाजताच्या दरम्यान आगमन झाले व आपल्या भाषणाला सुरुवात करण्यात आली.


यावेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यावर सडकून टीका करण्यात आली.
या कार्यक्रमांमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, उत्तमराव इंगळे, नितीनभाऊ भुतडा, श्याम भारती महाराज, हदगाव हिमायतनगर महायुतीचे उमेदवार बाबुराव कोहळीकर, आमदार नामदेव ससाने, आरतीताई फुफाटे, महेशभाऊ काळेश्वरकर, महेंद्र मानकर, प्रकाश दुधेवार, सुदर्शन रावते, चितंगराव कदम तसेच घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी अनेक खेड्यापाड्यातील हजारो महिला तरुण, तरुणाई ज्येष्ठ मंडळी तसेच मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

