✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142814
✍️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 15 नोव्हेंबर) मॉडर्न पब्लिक (सी.बी.एस.ई) स्कूल, उमरखेड मध्ये दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पंडित नेहरू जयंती व बालदिनानिमित्त शाळेत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दिवसाचे महत्व सांगण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुंदर कार्यक्रम सादर केला.

विद्यार्थ्यांची दंत तपासणी
या कार्यक्रमात गायन, नृत्य आणि नाटक यांचा समावेश होता. तसेच बालदिनाचे औचीत्य साधून शाळेत दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात दोन तज्ञ दंतवैद्य डॉ. स्वप्नील नागोराव रावते,नांदेड (MDS) व डॉ. सुरेखा विठ्ठल मस्के (BDS) शाळेत आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांची काळजीपूर्वक दंत तपासणी केली.



या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्व समजले आणि दंत आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली.

दात किडणे, दात दुखणे अशा समस्या असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य तो सल्ला दिला आणि दंत स्वच्छता कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेच्या अध्यक्षा सौ. रेणूश्री राम देवसरकर ह्या उपस्थित होत्या यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांना शुभेछा दिल्या.
