[तपासणी नाके पार करून रेती वाहतूक होते तरी कशी….?]

उमरखेड :- महागाव तालुक्यातुन दररोज गौळ मार्गे मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतून होत असून यामुळे प्रशासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे.


रेती घाटाचे लिलाव होण्याच्या अगोदरच रेतीमाफियांनी महागाव रेती घाटावरून रेती लंपास करायला सुरुवात केली आहे. सदर अवैद्य रेती चोरी करून स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून रेती चोर मालामाल होत आहेत यामुळे या रेती माफियांना सुगीचे दिवस आल्याने अखेर रेती माफीयांना पाठबळ कुणाचे प्रश्न निर्माण होत आहे.


मुळावा परिसरात शासकीय व खाजगी बांधकामे चालु असुन गरजु बांधकाम धारकांना रेती माफीया कडून जादादराने अवैद्य रेती पुरविल्या जात असल्याचे समजते मुळावा परिसरात शासनाकडून रमाई आवास व शबरीआणि पंतप्रधान आवास योजने मधुन घरकुल मंजुर झाले आहे शासना कडून घरकुल बांधकाम मुदतीत पुर्ण न केल्यास पुढील निधी मिळणार नसल्याने घरकुलाचा पुढील निधी वापस जाणार या धास्तीने गरजू बांधकाम धारक रेतीमाफीया कडून ज्यादा दराने रेती घेऊन घरकुल बांधकाम पूर्ण करित असल्याचे दिसत आहे हया संधीचा फायदा घेत रेती माफीया कडून घरकुल लाभार्थ्याची आर्थीक लुट होत असल्याचे दिसत आहे,महागाव तालुक्यातील घाटावरून दररोज मोठ्या टिप्पद्वारे सकाळी सकाळी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान रेतीच्या ट्रीपा गावात पडत आहेत.


दररोज 4 ते 5 टिप्पर रेती घेऊन येत आहेत,तसेच एक स्विफ्ट डिझायर गाडी व काही व्यक्ती संपूर्ण तयारीमध्ये येतात या टिप्पर च्या मागे हि गाडी असते. मात्र प्रशासनाला हाताशी धरल्याशिवाय एवढी मोठी हिम्मत रेतीमाफिया करू शकत नाही.


अशीही नागरिकात चर्चा रंगू लागली आहे त्यामुळे उपविभागातील प्रशासनाला हाताशी धरून राजकीय वरदहस्तांच्या आशीर्वादाने रेती उत्खननाचा प्रकार मोठ्या प्रमाणात मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी बघायला मिळत आहे,त्यामुळे उपविभागीय अधिकारी तसेच महसूल कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्यासमोर चोरट्यांवर अंकुश लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
चौकट:- विधानसभा निवडणूक लागल्याने निवडणूक अधिकारी तसेच पोलिस कर्मचारी यांच्या अनेक ठिकाणी चेकपोस्ट आहेत,एकीकडे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरे यांच्या गाडीची तपासणी होत आहे, परंतु रेती घेऊन येणाऱ्या टिप्परची का होत नाही अशी जनतेमध्ये जोरदार चर्चा रंगत आहे.
रेती माफिया उघडपणे रेती घेऊन येत आहेत,त्यामुळे पोलीस व महसूल कर्मचारी मोठी आर्थिक देवाणघेवाण करून या रेती चोराकडे दुर्लक्ष करत असल्याचे चर्चा केली जात आहे.