
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
उमरखेड (दिनांक 2 नोव्हेंबर) हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी.या सणाची लहान-मोठ्यांसह सर्वांनाच ओढ लागलेली असते.प्रत्येकजण गावी जाण्यासाठी उत्सुक असतो. त्यांची ही इच्छा एसटी महामंडळाचे चालक व वाहक पूर्ण करतात.

हे करताना त्यांना मात्र घरापासून दूर राहावे लागते. त्यांची ही अडचण लक्षात घेत उमरखेड आगारप्रमुखाने मुक्कामी असलेल्या चालक व वाहकांचे पहाटे औक्षण करून अभ्यंगस्नान केल्यामुळे त्यांचेही डोळे पाणावले.
कर्तव्यावर असणारे एसटी चालक-वाहकांना कधीकधी अनोळखी गावी मुक्कामी राहावे लागते. अशावेळी त्यांना दिवाळी सणात सहभागी होता येत नाही. त्यांना अभ्यंगस्नानासारख्या महत्त्वाच्या प्रकारालाही मुकावे लागते. मात्र, उमरखेड आगारात १ नोव्हेंबरला दिवाळीचा सण आनंदात व विशेष उपक्रमांनी साजरा करण्यात आला.


प्रमोदिनी किनाके या आगार प्रमुखांच्या आपुलकीच्या दृष्टिकोनामुळे एसटी औक्षण करताना प्रमोदिनी किनाके कर्मचाऱ्यांसाठी ही दिवाळी अनोखा अनुभव देऊन गेली.
रात्री मुक्कामी असणारे चालक आणि वाहक विशेषतः जे बाहेरगावाहून आले असतात त्यांना घरी आल्यासारखे वातावरण मिळावे.यासाठी आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मॅडम यांनी बसस्थानकात व्यवस्था केली होती.
स्नानासाठी उटणे व इतर सामुग्रीची व्यवस्था करून सर्वांना घरच्या ऊबदारतेचा अनुभव दिला. तसेच एका मोठ्या बहिणीप्रमाणे प्रमोदिनी किनाके यांनी सर्वांचे औक्षण केले. गडचिरोली, संभाजीनगर, ब्रह्मपुरी, उमरखेड व इतर आगारांतून आलेल्या कर्मचाऱ्यांना फराळ आणि मिठाईचे डबे देऊन
सन्मानित केले. त्यामुळे हे क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय बनले.


किनाके यांच्या आयोजनामुळे आगारातील कर्मचारी पहाटे ५ वा उपस्थित झाले होते.
या स्तुत्य उपक्रमासाठी आगार प्रमुख य प्रमोदिनी किनाके यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.