(पोलीस स्टेशन उमरखेड पोलीसांची कारवाई)
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

यवतमाळ:- जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे अवैद्य शस्त्र (अग्नीशस्त्र बाळगणारे तसेच उघड गुन्हे, आरोपी शोध तसेच मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक श्री कुमार चिंता (भा.पो.से.) यांनी पोलीस निरीक्षक पो.स्टे. उमरखेड श्री शंकर पांचाळ यांना आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री शंकर पांचाळ पोलीस स्टेशन उमरखेड यांनी अधिनस्त डि.बी. पथक तसेच बिट अंमलदार यांना गोपनिय माहिती काढुन उघड न झालेले गुन्हे उघड करुन आरोपी शोध घेणे बाबत सुचना दिल्या आहेत.


दि.१०/०४/२०२५ रोजी पोलीस स्टेशन उमरखेड बिट क्र.३ चे बिट जमादार पो. हवा. २८ जयकुमार राठोड व रायटर पो.शि. २०१ विष्णु राठोड हे मोटार सायकल चोरी व नगदी कॅश चोरी तसेच उघड न झालेले गुन्हे मधील आरोपी शोध व माहिती काढत असतांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की,

पो.स्टे. उमरखेड अपराध क्र.१७९/२०२५ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. गुन्ह्यातील मोटार सायकल इसम नामे महिपाल घिसारामजी वर्मा वय २१ वर्ष रा. रुलीयानापट्टी पोस्ट सिहोबड्डी ता. लक्ष्मणगढ जि. शिखर राजस्थान ह.मु. बोरबन उमरखेड यांनी चोरुन नेलेली असुन तो बैंगलोर (कर्नाटक) येथे राहत आहे असी गोपनिय माहिती मिळाल्याने तसेच मोबाईल टॉवर लोकेशन वरुन पो.नि.शंकर पांचाळ, स.पो.नि. पांडुरंग शिंदे सा., यांचे मार्गदर्शनात पो. हवा. २८/ जयकुमार राठोड व पो.शि.२०१ / विष्णु राठोड यांना बैंगलोर (कर्नाटक) येथे रवाना करुन सायबर सेल यवतमाळचे मदतीने गुन्ह्यातील चोरीस गेलेली नवीन मोटार सायकल क्रमांक MH29 CG5778 (बजाज कंम्पनीची पल्सर) मॅडेलची गाडी अंदाजे किंमत १,४०,०००/- रुपयाचे चा मुद्देमाल असल्याची खात्री करुन मुद्देमाल पोलीस स्टेशन के. आर. पुरम जि. बैंगलोर (कर्नाटक) हद्दीतुन चोरीची मोटार सायलक जप्त करुन केले व आरोपीस ताब्यातुन घेतले व दिनांक १२/०४/२०२५ पो.स्टे.उमरखेड येते जेरबंद केले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता, मा. अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड श्री हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उमरखेड श्री शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. पांडुरंग शिंदे, पो. हवा. जयकुमार राठोड, पो.शि.विष्णु राठोड यांनी सायबर सेल यवतमाळ यांचे संयुक्त टिमने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

व सदर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास मा. पोलीस निरीक्षक पो.स्टे. उमरखेड श्री शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. पांडुरंग शिंदे, पो.हवा. जयकुमार राठोड हे करीत आहे.