
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड :- तालुक्यातील श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद व्दारा संचलित श्री शिवाजी विद्यालय चातारी येथील इयत्ता नववी वर्गात शिकत असलेल्या सुमित गजानन केशवे या विद्यार्थ्यांचा मुंबई येथे डॉ.होमी भाभा वैज्ञानिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल १२ एप्रिल रोजी मुंबई येथील आयोजित भव्य कार्यक्रमात सुमित केशवे यास सुवर्णपदक बहाल करण्यात आले,

त्यामुळे चातारी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा लागला असून या विद्यालयात इयत्ता सहावी आणि नववीला सीबीएसई,आय सी एस सी व बोर्डाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट असलेल्या विज्ञान विषयावर आधारित परीक्षेत यश मिळवल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आणि वैज्ञानिक पाया मजबूत करण्यासाठी सदर परीक्षा उपयोगी आहे ही परीक्षा १९८१ पासून ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन द्वारे आयोजित केली जाते.

सिद्धांत स्पर्धा, व्यावसायिक स्पर्धा,सामान्य मुलाखत व कृती संशोधन प्रकल्पाचे मूल्यांकन आणि मुलाखत या अनोख्या चार टप्प्यातील स्पर्धेचे उद्दिष्ट तरुण शास्त्रज्ञांमध्ये उत्सुकता जागृत करणे, समस्या सोडवण्याची वृत्ती निर्माण करणे तसेच निरीक्षण आणि कौशल्यांमध्ये अचूकता विकसित करणे आहे.
स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या वातावरणाबद्दल संवेदनशील बनवणे आणि गरज पडल्यास तर्कसंगत पुढाकार घेण्याचे धाडस करणे हे देखील उद्दिष्ट आहे.

सुमित केशवे यांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल त्यांचे पालक गजानन केशवे मार्गदर्शक शिक्षिका पुजा वऱ्हाडे व सौ. ज्योती पिंपरखेडे यांचे अभिनंदन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर सचिव अश्विनीताई पाटील चोंढीकर श्री शिवाजी विद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने, अँड. अर्चनाताई माने मुख्याध्यापक हरी खोकले यांनी केले आहे.

चौकट :- विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाची ठीणगी पेटवीली तर यशाचा निखारा सदैव पेटलेला राहील. – डॉ. विजय माने(चेअरमन,श्री शिवाजी विद्यालय, चातारी)