
(प्रियदर्शनी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २,३६९वी जयंती भीम जयंती उत्सव समिती कडून आनंदात साजरी.)
✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
उमरखेड (दिनांक 6 एप्रिल) शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार येथे प्रियदर्शनी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २,३६९वी जयंती १३४वी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती (भीमजयंती मंडळ) कडून आनंदात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रियदर्शनी महान राजा चक्रवर्ती सम्राट अशोक (इ.स.पू. ३०४ – मृत्यू इ.स.पू. २३२) हे भारतीय सम्राट आणि मौर्य घराण्यातील तिसरे शासक होते. त्यांनी प्राचीन भारतावर इ.स.पू. २७२ – इ.स.पू. २३२ दरम्यान राज्य केले. त्यांना चक्रवर्ती सम्राट अशोक, महान अशोक आणि अशोक द ग्रेट नावांनीही ओळखले जाते.

अशोक हे भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा लोककल्याणकारी राजा ज्यांनी अखंड भारताचा बहुतांश भाग काबीज केला होता. सम्राट अशोकांनी सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.
सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट’. जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले.त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही.

सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ, भूतान इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत.


कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले.सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता.अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख आणि ८४ हजार स्तूप हे भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात. त्यामुळे अशोकांबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे.


सम्राट अशोक सत्य, अहिंसा, प्रेम, सहिष्णूता आणि शाकाहारी जीवनप्रणीली यांचे थोर पुरस्कर्ते होते म्हणूनच एक अतिशय परोपकारी प्रशासक अशीच इतिहासात त्यांची ओळख झाली आहे.म्हणून अखंड भारतावर राज्य करणारे महान राजे सम्राट अशोक हेच एकमेव राजा – असे प्रतिपादन सिध्दार्थ दिवेकर पत्रकार तथा शहराध्यक्ष भीम टायगर सेना यांनी केले.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे आयोजक प्रफुल दिवेकर, योगेश दिवेकर अध्यक्ष जयंती उत्सव समिती, कार्याध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर,आकाश श्रवले, कोषाध्यक्ष आकाश पाईकराव, आदित्य खिल्लारे, अमोल दिवेकर,भंते कीर्ती बोधी, भारताबाई दिवेकर,यशोदा दिवेकर, लता मुनेश्वर, यशोधरा धबाले सुभद्राबाई पाईकराव इत्यादी अनेक जण उपस्थित होते.