
[महागाव सारख्या लहानशा गावामधून राष्ट्रीय गौरव पुरस्कार पर्यंत जाणे की कौतुकास्पद बाब – अक्षय किल्लोर (पती) ]

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
महागाव (दिनांक 27 मार्च) प्रा. भावना मनोज तायडे श्री. विठ्ठल रुक्मिणी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सवना महागाव जि. यवतमाळ यांना विसवी अखील भारतीय प्रतिभा सन्मान महासंमेलन २०२५ अमरावती अंतर्गत देण्यात येणारा राष्ट्रीय गौरव तसेच नारीशक्ती सन्मान पुरस्कार दि. २३ मार्च २०२५ रोजी रौलिष हॉटेल अमरावती येथे प्रदान करण्यात आला.

यामध्ये डॉ. क्रांती महाजन (आरटीबीआर) यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासातील गौरव पूर्ण नावं असणारे तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज कुणालदादा मालुसरे तसेच डॉ. गुरुतेजसिंह ब्रार (निदर्शक आणि राष्ट्रीय परीक्षक बठींडा पंजाब) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

प्रा. भावना मनोज तायडे यांचे महिला सशक्तीकरण, संशोधन लेख, सावित्रीबाई फुले ग्रंथ लेखन तसेच महिला सक्षमीकरणासाठी असणारी विचासरणी आणि कार्य, अध्यापन सेवा यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी तो आपले वडील मनोज तायडे तसेच आई माला तायडे, मुलगी कस्तुरी किल्लोर यांच्या सोबत स्वीकारला. त्या आपले प्रेरणास्थान आपले पती अक्षय किल्लोर यांना मानतात.


महागाव सारख्या लहानशा गावामधून राष्ट्रीय गौरव पुरस्कार पर्यंत जाणे की कौतुकास्पद बाब आहे.
महागाव तालुक्याच्या अभिमानात मानाचा तुरा रोवल्याबद्दल प्रा. भावना तायडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.