✍️ करण भरणे सर (प्रतिनिधी ढाणकी)

उमरखेड तालुक्यात अवैध रेती माफिया वाढत असून अवैध रेती चोरून श्रीमंत होण्याच्या नादी अवैध रेती वाहन धारक पुष्पा स्टाईलने भर गर्दी च्या रस्त्यात वहान चालून भीती घालत आहे. याच बेलगाम अवैध रेती माफियाला वटणीवर आण्यासाठी मालिका चालू केली आहे.

यात उमरखेड तालुक्याचे तहसीलदार यांनी इमानदार आणि प्रामाणिक मंडळ अधिकारी यांना नेमून वाळू माफिया यांची झोप उडवली आहे.

यातच गजानन सुरोशे मंडळ अधिकारी यांना माहिती मिळाली की, 26 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी गांजेगाव येथिल पैनगंगा नदिवर असलेल्या पुलावर रेतिचे वाहण भरणे सुरु आहे.
यावरून त्यांनी गांजेगाचे ग्राम महसुल अधिकारी नामे ए. आर. शिंदे यांना याबाबत माहिती देऊन . आर.ए. भंडारे (ग्राम महसुल अधिकारी) वासुदेव जिंकूटवार (ग्राम महसुल सेवक) यु.के. राठोड (ग्राम महसुल सेवक) यांना सोबत घेवुन कार्यवाही करिता वरिष्ठांना माहिती दिली.

सायंकाळी पथकासह गांजेगाव रोडवर थांबून रेती वाहतूक पिकअप वाहण येत असतांना त्यांनी हाताचा ईशारा दाखवुन थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो न थांबता सरळ गांजेगाव येथिल कॅनलच्या कच्या रस्त्याने भर धाव वेगाने नेऊन तो सोईट महागाव रोडने जोरात वेगाने आणुन कृष्णापुरकडे जाणाऱ्या रोडवर गेला असता गजानन सुरोशे व त्यांच्या टिमने पाठलाग करून पिकअप वाहण हे कृष्णापुरच्या तलावाजवळ रोडवर थांबविले.

त्या वाहणाची पथकांने पाहणी केली असता. त्यात रेती भरून मिळुन आली सदर वाहण चालकास पथकाने महसुलचे भरारी पथक असल्याचे सांगितले असता वहाण चालकास त्यांचे नाव विचारले असता त्यांने त्याचे नाव सुनिल कदम वय (45) रा. ढाणकी असे सांगितले सदर वाहण चालकास रेती बाबत रेती वाहतुक परवाणा आहे का? विचारणा केली असता वाहण चालकांनी रेती वाहतुक करण्याचा परवाणा नसल्याचे सांगितले.

त्यावरून महसूल पथकांने सदर वाहण क्र.एम.एच.28 एच. 7493 मध्ये आर्धा ब्रास रैती त्याची किंमत 3000/ रुपये व वाहणाची किंमत अंदाजे 90,000/ रुपये असा एकुण मुद्देमाल 93,000/रुपयेचा जप्त करून ढाणकी पोलिस चौकी येथे आणून नमुद ईसम नामे सुनिल कदम वय (45) रा. ढाणकी कृत्य कलम 303 (2) भा. न्या. सं. सहकलम 1 सहकलम 15 पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 प्रमाणे होत असल्याने त्यांचे विरुध्द कायदेशिर पोलीस कार्यवाही केली.