
तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन फक्त नागरिकांची लूट करण्यापूर्ती.
✍️ समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)

श्रीक्षेत्र माहूर (दिनांक १७ फेब्रुवारी) गोरगरिबासाठीच जप्त वाळूचा लिलाव जप्त वाळू हराशी घेणाऱ्यांनी गरिबांना कमी दरात वाळू देण्याचे तहसीलदारांचे आवाहन् जरी असेल तरी सत्य परिस्तिथी मध्ये जास्त दराने वाळू विक्री सुरू आहे.

श्रीक्षेत्र माहूर तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन जरी करण्यात आले असले तरी अक्षरशः पाहता वाळू ज्यादा दराने विक्री सुरू आहे चोलेवाडी येथील जप्तीचा साठा जशास तसे असून वाळू मात्र नदीपात्रातून उपसा सुरू आहे.

आणि तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी यांचे अजून सुद्धा या कडे दुर्लक्षच करीत आहे कुठेतरी हा प्रकार थांबवा व गोर गरीब घरकुल लाभार्थ्यांना यांचा लाभ मिळावा असे जनतेतून मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसा पूर्वी याच चोले पॉइंट वर सत्यता दाखवण्यासाठी पत्रकार गेले असता त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. व आज पुन्हा तोच प्रकार होण्याची वाट तहसीलदार बघत आहेत का असा प्रश्न जनतेपुढे पडला आहे.

गोर गरीब घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर पावत्या काढून ज्यास्त पैसे देणाऱ्यांना च वाळू मिळते हे मात्र खरे गरीब लाभार्थ्यांना याचा तीळ मात्र उपयोग होत नाही.