(DB उमरखेड यांची कारवाई)

✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
यवतमाळ (दिनांक 14 फेब्रुवारी) जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे, शस्त्र बाळगणाऱ्या तसेच आरोपी शोध, अवैद्य धंदे, गुंगीकारक औषध द्रव्याची तस्करी समुळ उच्चाटल व्हावे या करीता पोलीस अधिक्षक, कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उमरखेड यांना वेळोवेळी केलेल्या आदेशानुसार त्याअनुषंगाने पो.नि. पो.स्टे. उमरखेड त्यांचे अधिनिस्त डिटेक्शन बँच (DB) पथकाला यांना गोपनिय माहीती काढुन प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.

दि. 13/02/2024 रोजी डिटेक्शन बॅच (DB) पथक उमरखेड यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस स्टेशन उमरखेड शहर हद्दीतील रहिमनगर उमरखेड कडील ग्राम बिटगावकडे कच्चा रस्त्याला लागुन असलेल्या कॅनालच्या पुलावर एक इसम नामे इब्राहिम खान पिर खान वय अंदाजे 55 वर्ष हा अवैद्रद्यरित्या गांज्या आमंली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने घेवुन बिटरगाव कॅनॉलच्या कच्च्या रस्त्यानी येत आहे.

अशी माहीती मिळाल्याने डिटेक्शन बॅच (DB) पथक उमरखेड यांनी तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन बिटरगाव कॅनॉलच्या कच्च्या रस्त्याने सापळा कारवाई करुन नामे इब्राहिम खान पिर खान वय अंदाजे 55 वर्ष यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्याताली थैलीची पाहणी केली असता त्यामध्ये हिरवट काळपट गांजा आमंली पदार्थ 1 किलो 196 ग्राम गांजा किंमत अंदाजे 23,920/-रुपये चा मुद्देमाल जप्तीसह आमंली औषधी मनप्रभावी पदार्थ अधिनियम चे कलम 8 (क), 20 (ब), (2), (ब) अन्वये अपराध क्र.१।/2025 प्रमाणे पोलीस स्टेशन उमरखेड येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन उमरखेड जिल्हा हि अवैध्य धंदे, शस्त्र बाळगणारे तसेच गुंगीकारक औषध द्रव्याची तस्करीचे उच्चटल करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबधी माहीती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसांची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसाना सहकार्य करावे हि विनंती.

सदर कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब, मा. यवतमाळचे अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड साहेब उमरखेड, ठाणेदार पोलीस निरीक्षक, श्री शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. उमरखेड डिटेक्शन बॅचचे (DB) पो.उप.नि. सांगर इंगळे, पोहवा/2020 संदिप ठाकुर, पोहवा/2437 दिनेश चव्हाण, पो.कॉ./1652 संघशिल टेंबरे, पो.कॉ./1191 निवृत्ती माहानळ, पो.कॉ./928 घुसे, म.पो.कॉ./885 सिमा इंगळे, चापोहवा/1991 समिर पो.स्टे. उमरखेड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
पुढील तपास स.पो.नि. पांडुरंग शिंदे हे करीत आहेत.