(महिला विश्व बौद्ध धम्म परिषद उमरखेड जि.यवतमाळ मध्ये दादासाहेब शेळके यांचे प्रतिपादन)

उमरखेड (दिनांक १ फेब्रुवारी) शेरा मधील माहेश्वरी खुलेनाट्यगृह येथे महिला विश्व बौद्ध धम्म परिषद आयोजन प्रभाकर पाईकराव यांनी केले होते.

या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून भिम टायगर सेना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके हे होते.दादासाहेब शेळके यांनी आपल्या आक्रमक व फायर ब्रँड स्पीच मध्ये बोलताना पुढे म्हणाले की, समाजाने आपला नाटकी व दिखावापणा बाजूला ठेवून कृतीशील बौद्ध बनण्यावर लक्ष द्यावे.

१५ ऑक्टोबर १९५६ च्या दीक्षाभूमी, नागपूर येथील भाषणामध्ये बाबासाहेबांची खंत व्यक्त केली होती की परत मनुवादी आम्हाला हिणवतील महाराणी पवित्र असा बौद्ध धम्म बाटविला सध्याची समाजातील परिस्थिती बघता हे शंभर टक्के खरे वाटत असुन आम्ही बौद्ध धम्म बाटविण्याचे काम करत आहोत.

कारण बाबासाहेबांनी जातीला कंटाळून आम्हा सर्वासह बौद्ध धर्म स्वीकारला आज आम्ही स्वतःला धम्माचे उपासक/उपासिका आणि आंबेडकरी अनुयायी समजत असताना आम्हीच पोटजात १००% सुरक्षित ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे इतरांना मनुवादी जातीवादी म्हणण्या पेक्षा खऱ्या अर्थाने आम्हीच पोटजात जीवंत ठेवणारे खरे जातिवादी ठरत नाही का? याचे आत्मचिंतन आजच्या धम्म परिषदेच्या निमित्ताने उपासक उपासिका यांनी करणे आवश्यक आहे.

एकदा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पत्रकाराने एक प्रश्न विचारला होता मुस्लिम बांधव त्यांच्या टोप्या आणि दाढीमुळे ओळखता येतो शिख बांधव त्यांच्या पगडीमुळे ओळखता येतो तर बौद्ध बांधवांना आम्ही कसे ओळखावे त्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर तुम्हा आम्हा सर्वांवर विश्वास ठेवून म्हणाले की माझा बौद्ध उपासक/उपासिका त्याच्या वर्तन आणि आचरणाने ओळखू येतील सध्याचे आमचे वागणे,आचरण आणि वर्तन बघता कृतीशी आमचा दुरान्वयानेही संबंध येतो का ? यांचे चिंतन करण्याची गरज आहे.

३१ जानेवारी १९२० ला म्हणजे आजच्या तारखेला पाक्षिक मूकनायक चा पहिल्या अंकाच्या मनोगत या सदराखाली संपादकीय लिहताना बाबासाहेबांनी लिहिले होते. हिंदू धर्म ही ४ मजली इमारत असून त्या इमारतीला शिडीच नाही. त्यामुळे खालच्या मजल्यातला व्यक्ती वर येऊ शकत नाही आणि वरच्या मजल्यातला व्यक्ती खालच्या मजल्यावर येउ शकत नाही. ह्या मजल्याच्या उतरंडीला कंटाळून बाबासाहेबांनी धर्मांतर केले होते.

हिंदू मानसिकतेला पोटाशी कवटाळून धरल्या मुळे आम्ही आज पोट जातीच्या माध्यमातून ४ मजली इमारत जिवंत ठेवली आहे की नाही याचा विचारही आजच्या धम्म परिषदेच्या निमित्ताने बौद्ध बांधवांनी केला पाहिजे.पुर्वी आमच्या म्हणणार्या धर्म व धर्म ग्रंथांनी समस्त महिलांना पायाखाली ठेवले होते.

पण डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आर्टिकल १४ नुसार समस्त महिलांना माणसाच्या बरोबरीला आणले आहे. संविधानाच्या अगोदर जगाच्या पाठीवर पहिला महापुरुष तथागत गौतम बुद्धाला इ.स.पु.५२८ मध्ये बुद्धगया, बिहार येथे ज्ञानाची प्राप्ती झाल्या नंतर त्यांनी भिक्खू संघामध्ये भिक्खूनी संघ निर्माण करून समस्त महिलांना सन्मानाची व समानतेची वागणूक देणारे प्रथम बुद्धच होते त्यांचे आपण अनुयायी आणि उपासक असल्यामुळेच आजच्या महिलांनी “महिला विश्व बौद्ध धम्म परिषद” घेतली असल्याचे दादासाहेब शेळके शेवटी म्हणाले कार्यक्रमाचे आयोजन प्रभाकर उर्फ पायलट भैय्या पाईकराव यांनी केले होते तर सूत्रसंचालन काळबांडे साहेब यांनी केले .

तर आभार प्रदर्शन भिम टायगर सेना शहर प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार सिद्धूभाऊ दिवेकर यांनी मानले आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.प्रा.काळबांडे सर प्रा.रोकडे सर भीम टायगर सेनेचे उपजिल्हाप्रमुख करण भरणे सर तालुका अध्यक्ष कैलास दादा कदम माजी सभापती संबोधी गायकवाड सचिन गिरबिडे मोंटी वाठोरे आदी उपस्थित होते. यावेळी धम्मपरिषेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.