
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड एसटी बस स्थानका समोरील नंद लॉज मध्ये एका २५ वर्षीय युवकाने गळफास घेवून आत्महत्या घडल्याची घटना दिनांक ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान उघडकीस आली आहे.

पवन साहेबराव इंगळे (२५) असे मृतकाचे नाव असून तो नंद लॉज मध्ये मॅनेजर असलेल्या वडिला जवळ दुपार दरम्यान गेला होता.
वडिल साहेबराव यांना घरुन जेवणाचा डब्बा घेवुन या तो पर्यंत मी लॉज सांभाळतो असे त्याने सांगीतल्याने वडिलाने त्याला जेवणाचा डब्बा आणून दिला. त्याच दरम्यान रिकाम्या झालेल्या खोली नंबर २ मध्ये जेवण करतो व लॉज सांभाळतो म्हणून वडिलाला घरी पाठवीले.

वडिल साहेबराव लॉजवर ४ वाजता दरम्यान पोहचले मात्र मुलगा पवन हा जेवण करून आराम करित असल्याचे समजून वडिलाने डिस्टर्ब केले नाही मात्र ५ वाजे पर्यंत त्याने दरवाजा उघडला नसल्याने वडिल साहेबरावने आवाज दिला, परंतू काहि प्रतिसाद मिळत नसल्याने वडिलाने लॉज मालकाला सांगून दरवाजा तोडला असता पवन हा बेडसिटच्या साहाय्याने रुममधील पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले.

पूढील तपास उमरखेड ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात होत असून मृतक हा अविवाहीत होता व कॅटरिंगचे काम करित असतांना त्यांना आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.