
(जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा..!)
✒️समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)
श्रीक्षेत्र माहूर अतिशय दुर्गम भागातील आनमाळ येथील पोलीस पाटील दिलीप नरवाडे यांचा मुलगा अंकुश हा अन्न भेसळ अधिकारी (वर्ग 1) बनला आहे. त्यानिमित्त दि. 24 जाने. रोजी आनमाळकरांकडून त्याचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भ्रमणध्वनीवरून त्याचे अभिनंदन केले.

सत्काराला उत्तर देतांना अंकुश नरवाडे याने सर्वांचे आभार मानून यशस्वी होण्यासाठी विद्याथ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचन करावे असे आवाहन केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे, राज ठाकूर, सिद्धार्थ तामगाडगे, पो.पा. संदेश तुळसे, सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी सावळे, सूर्यवंशी यांनी आपल्यामनोगतातून त्याला शुभेच्छा दिल्या. सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच संभाजी खिल्लारे हे होते.

कार्यक्रमाला तंटामुक्ती अध्यक्ष सुकलाल राठोड, उपसरपंच गजानन खूपसे, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील, सरचिटणीस शिवप्रसाद कदम, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा चंदाताई ठाकरे,बोललो होतो मी गुलाल आपलाच असणार अंकुरा दिलीप नरवाडे,अनिता बोन्डलवार, संतोष दुबे यांचेसह विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.

सूत्रसंचलन नरवाडे यांनी केले, तर दिलीप नरवाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश नरवाडे, राहुल नरवाडे, विकास नरवाडे, संदीप भवरे, राजु नरवाडे आदींनी परिश्रम घेतले.