
✍🏻समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)
माहूर (दिनांक २२ जानेवारी) जि.प.प्रा.लसनवाडी स्वयंपाकी मदतनीस किरण आदिल राठोड मदतनीस आदिल बंडू राठोड हे गेल्या सात दिवसांपासून पंचायत समिती समोर उपोषण करता बसले असून अद्यापही त्यांना शासनाचा कुठलाही कर्मचारी भेटला नसून आदिल बंडू राठोड यांची दिनांक २०/०१/२०२५ प्रकुती बिघडली होती.

पण जिद्द न सोडता माझ्यावर अन्याय करणाऱ्या व मला व माझ्या पत्नीला कामावर जो पर्यंत घेणार नाहीत तो पर्यंत मी उठणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे.
आणि कुणीतरी आपल्याला न्याय मिळून देईल या आशेने ते त्याच ठिकाणी सात दिवसापासून पत्नी व मुलाला घेऊन तळ ठोकून बसले आहे.