🖊️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9922870518
🖊️सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक ७ डिसेंबर) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय राज्यघटनेचे, शिल्पकार,महामानव, बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य दिव्य कॅन्डल मार्च अभिवादन रॅली काढून शेकडो अनुयायांच्या उपस्थितीत विनम्र अभिवादन करण्यात आले.


या कार्यक्रमाची सुरुवात ६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता सम्यक बुद्ध येथे पंचशील ध्वजाचे अर्धवट ध्वजावर रोहन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.त्यानंतर सायंकाळी ७ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधून भव्य दिव्य कॅन्डल मार्च अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.


सदर रॅली ही डॉ बाबासाहेब आंबेडकर वाढ मार्गे निघून नागचोक माहेश्वरी चौक छत्रपती शिवाजी चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शेकडो आणि यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.



त्यानंतर लगेच सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी हिराबाई दिवेकर (माजी नप नगरसेविका), उषाताई इंगोले अध्यक्ष रमामाता महिला मंडळ, प्रफुल दिवेकर (शहराध्यक्ष आझाद समाज पार्टी), या पत्रकार सिध्दार्थ दिवेकर शहराध्यक्ष भीम टायगर सेना,

संतोष इंगोले, तुषार पाईकराव, मनोज इंगोले, यशोधरा धबाले, गौतम दिवेकर,विजय दिवेकर, नागोराव दिवेकर, जिजाबाई दिवेकर, भारताबाई दिवेकर, जानकाबाई इंगोले इत्यादी शेकडो उपासक उपासिका तरुण मंडळी आणि बालक-पालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.