🖊️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
🖊️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
✒️ समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी)


माहूर (दिनांक ७ डिसेंबर) तालुक्यात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतिय राज्य घटणेचे शिल्पकार भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनाचे औचित्य साधून आंबेडकराईट यूथ फोरम व तर्फे आंबेडकर चौक येथे दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी एक वही एक पेन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संयोजक राहुल भगत सर, यांच्या हस्ते पुष्पहार टाकून व प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी राहूल भगत, प्रतिक कांबळे यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गरजू विद्यार्थ्यांना वही, पेन शालेय साहीत्याचे वाटप करण्यात आले, यावेळी प्रा. नंदकिशोर भगत, उमरखेड यांनी मार्गदर्शन केले.


यावेळी त्यांचे समवेत जयंत गि-हे, डॉ. सत्यम गायकवाड, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, सामाजिक कार्यकर्ते मनोज कीर्तने,अनिल कांबळे, कनिष्क वानखेडे, पत्रकार समाधान कांबळे, एकनाथ मानकर, राजेश कोंडे, राहुल नरवाडे,

हर्ष भवरे, आशुतोष इंगोले, रेणुकादास वानखेडे, राजेश मगरे, विकास शिंदे, सुभाष दवणे, यांचेसह अनेक कार्यकर्ते व आंबेडकर प्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य संकलित केले.