

[भाजपचे अधिकृत उमेदवार किसनराव वानखेडे यांनी 16629 मतांनी विजयी]
(भाजपाला मिळाली लाडक्या बहिणीची साथ)
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 23 नोव्हेंबर) महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सुरू झाल्यापासून भारतीय जनता पार्टी कडून महायुतीचे अधिकृत उमेदवार किसनराव वानखेडे यांनी (एससी राखीव) उमरखेड मतदार संघामध्ये आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षांमध्ये सरळ लढत होती. जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या प्रचाराला सुरुवात केली.

किसनराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी केंद्रीय मंत्री तसेच अमित शहा गृहमंत्री यांच्याही सभा मोठ्या संख्येच्या प्रमाणात यशस्वीरित्या संपन्न झाल्या होत्या. याचाच फायदा नवीन चेहरा असलेले किसनराव वानखेडे यांना आज मतदात्याकडून 108682 लाखोच्या संख्येने मतदान करून किसनराव वानखेडे यांना विजयी केले आहे.त्यामुळे भाजपाने उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये विजयाची हॅट्रिक साधली आहे.
या अगोदर राजेंद्र नजरधने, नामदेव ससाने यांना उमेदवारी देऊन विजयी करण्याचे मोठे कार्य नितीन भुतडा यांनी केले होते. आज पुन्हा जनतेला आजी आणि माजी नको असल्यामुळे जनतेच्या सेवेसाठी नवीन चेहरा गरीब माणूस जनसेवक म्हणून किसनराव वानखेडे यांच्या स्वरूपाने देण्यात आला.
आपले सर्व पान प्रणाला लावून एका ताकतीने वानखेडे यांना विजयी करण्याचे विडाच नितीन भुतडा यांनी उचलला होता.

वानखेडे यांना विजयी करण्यासाठी 16629 मतांनी विजयी केले आहे.
तर काँग्रेसचे साहेबराव कांबळे 92053 मते मिळाली, मनसे चे राजेंद्र नगरधने 7061, वंचित चे तातेराव हनवते 1875, आजाद पार्टीचे देवानंद पाईकराव 601, बहुजन समाज पार्टी रणवीर 776, बळीराजा पार्टीचे बाळासाहेब रास्ते 188, आणि अपक्ष उमेदवार विजयराव खडसे 2881, भाविक भगत 538, विद्वान केवटे 1413, शिरसाठ 1222, मंजुषा तिरपुडे 1046, डॉ. मोहन मोरे 313, लांडगे 265, अंकुश रंजकवाड 144, प्रज्ञेश पाटील 110, आत्माराम खडसे 97 इत्यादी मते मिळाली आहे तसेच नोटा 654 मते झाले आहे.भाजपाचे अधिकृत उमेदवार किसनराव वानखेडे हे विजय झाल्यामुळे उमरखेड शहरामध्ये त्यांची विजयी रॅली काढण्यात आली.


सदर रॅली ही भारतीय घटनेतील शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या दिलेल्या सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
