
(जिल्हा कारागृह, वाशिम येथे केले स्थानबध्द)
(यवतमाळ जिल्हा पोलीसांची कारवाई)
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) मो.9823995466


उमरखेड (दिनांक 22 नोव्हेंबर) पोलीस ठाणे उमरखेड हद्दीतील धोकादायक व्यक्ती नामे अक्षय दिगांबर गायकवाड वय 25 वर्ष, रा. इंदिरानगर उमरखेड हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड येथे सन 2018 ते सन 2024 पावेतो विविध कलमान्वये अपहरण करुन खंडणी मागुन जबरी चोरी करणे, स्त्रीचा विनभंग करुन मारहाण करणे व शिवीगाळ करुन धमक्या देणे, अडवणुक करुन मारहाण करणे, गैर कायद्याची मंडळी जमवुन हातात प्राणघातक शस्त्र घेवुन गंभिर दुखापत करुन संपत्तीचे नुकसान करणे, अवैद्यरित्या शस्त्र बाळगुन दहशत निर्माण करणे असे विविध स्वरुपाचे गंभिर गुन्हे दाखल असल्याने ठाणेदार पोलीस स्टेशन उमरखेड यांनी त्यास स्थानबध्द करणे करीता MPDA कायद्यान्वये प्रस्ताव तयार करुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड व मा. पोलीस अधिक्षक साहेब, उमरखेड यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांच्याकडे सादर केला होता.


मा. जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांनी सदर प्रस्तावास मान्यता देवुन दिनांक 18/11/2024 रोजी त्याचे स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत केले असल्याने व त्यास यापुर्वीच स.पो.नि. सारीका राऊत पो.स्टे. उमरखेड यांचेकडे तपासावरील गुन्हा अपराध क्र. 534/2024 कलम 76,115(2), 351(1),351 (2), 3 (5), 296 भा.न्या.स., सह क. 142 म.पो.का. मध्ये दिनांक 06/11/2024 रोजी प्रो.पो.उप.नि. सागर इंगळे पो.स्टे. उमरखेड यांनी पुणे येथुन ताब्यात घेवुन हजर केल्याने त्यास पो.स्टे. उमरखेड येथे अटक करुन वि. प्रथम श्रेणी न्यायालय उमरखेड यांचे आदेशाने त्यास न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृह, वाशिम येथे दाखल करण्यात आले त्यावरुन धोकादायक व्यक्ती इसम नामे अक्षय दिगांबर गायकवाड वय 25 वर्ष, रा. इंदिरानगर उमरखेड यास सदर आदेश तामील करुन जिल्हा कारागृह, वाशिम येथे 01 वर्षा करीता स्थानबध्द करण्यात आले.


सदरची कार्यवाही ही श्री कुमार चिंता, पोलीस अधिक्षक यवतमाळ, श्री. पियुष जगताप, अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, श्री हनुमंत गायकवाड, उप. वि. पोलीस अधिकारी कार्यालय उमरखेड मार्गदर्शनात श्री जानोबा देवकते, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ, श्री धनराज हाके स.पो.नि.स्था.गु.शा. यवतमाळ, श्री. शंकर चिं. पांचाळ, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन उमरखेड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
सदर प्रस्तावाची छाननी व अभिलेख तयार करण्याची कामगिरी श्री दत्ता पवार पोहवा ब.नं. 1278 पोलीस स्टेशन उमरखेड यांनी पार पाडली.