(ढाणकीतील सय्यद खालिद यांनी मानले आभार)
करण भरणे (ढाणकी प्रतिनिधी)

ढाणकी :- (दिनांक 18 नोव्हेंबर) उमरखेड महागाव विधानसभा मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे यांची निवडून येण्याची जास्त शक्यता असल्याचे चित्र असताना उमरखेड मधील ढाणकी या गावातून मुस्लिम समाजाचा काँग्रेस पक्षाला मतदान न करण्याचा सूर निघत होता.

हे कळताच साहेबराव कांबळे यांनी भेट घेऊन त्यांची समस्या विचारली असता सय्यद खालिद आणि जब्बार यांनी सांगितलं की, या भागात आतापर्यंत एवढे आमदार, खासदार झाले पण कोणीही मुस्लिम समाजाच्या विकासासाठी आमदार, खासदार यांनी कधीच पुढाकार घेतला नाही यामुळे या विधानसभा निवडणूकीत जे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी बोलेल आम्ही त्यांच्या सोबत असेल. हे सांगून त्यांनी काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे समोर पुढील मागण्या केल्या होत्या.



1) मुस्लिम शादीखाना उपलब्ध करून देणे, 2) नवीन मुस्लिम कब्रस्थान जागेसह उपलब्ध करून देणे 3) ढाणकी येथील पाणी टंचाई दुर करावी, 4) टेंमेश्वर नगर येथील शासन हटवून तेथील लोकांना मालकी हक्क देणे.

या मागण्या पुर्ण करण्याचे काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी मुस्लिम समाजाला आश्वासन दिल्यामुळे ढाणकीतील मुस्लिम समाजाकडून सय्यद खालिद व जब्बार यांनी त्यांचे आभार मानून त्यांना आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले.