✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड :- (दिनांक 18 नोव्हेंबर) प्रख्यात साहित्यिक तथा मिलिंद महाविघालय मुळावाचे मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. अनिल काळबांडे तथा राज्यशास्र विभाग प्रमुख प्रा ज्योती काळबांडे यांची कन्या डॉ. आकांक्षा काळबांडे हिची केंद्रीय लोकसेवा आयोग दिल्ली च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परिक्षेत ती उर्तीण होऊन नुकतीच तीची सहाय्यक विभागीय वैधकीय अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.

डॉ.आकांक्षाचे माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या साकळे विघालयात झाले असून इयत्ता दहावित तीला प्राविण्यासह ९२% गुण मिळाले तर १२ वीचे शिक्षण देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात होऊन तिला ८५ % गुण मिळवतच तिने वैदकिय क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या निट परिक्षेत ४२५ गुण मिळाल्याने भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावतीला तिचा एम बी बी एस साठी २०१७ प्रवेशीत होउन २०२३ ला प्राविण्यासह उर्तीण होऊन तीने पी जी निटची तयारी केली.

त्यात ही तिने ऑल इंडिया १७ हजार रॅक मिळविली ते करीत असताना तीने १४ जुर्ले रोजी केद्रीय लोकसेवा आयोग दिल्ली व्दारे घेण्यात आलेल्या केद्रीय वैधकीय सेवा ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्या नंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दिल्ली येथील कार्यालयात तिची मुलाखत घेण्यात आली त्यात ती यशस्वी झाल्याने नुकतिच तिला कॅटगिरी २ मध्ये सहाय्यक विभागीय अधिकारीपदी तिची नियुक्ती झाली.

डॉ.आकांक्षा ला त्वचा रोग तज्ञ म्हणून पी जी करण्याचा तिचा मानस आहे.ति आपल्या यशाचे श्रेय आई प्रा ज्योती वडिल प्रा.डॉ. अनिल काळबांडे, काकु वर्षा काका प्रा सुनिल काळबांडे सह आजी प्रयागबाई कोंडबाराव खंदारे, मावशी इंजी कल्पना, मिनाक्षी सह लहान बहीण ओशीन एम आय टी आळंदी येथे कॅम्प्युटर सायन्सला शिक्षण घेत आहे. तिच्या सह गुरुजनांना देत आहे.
