
(सभेला हजारो नागरिकांनी केली गर्दी…!)
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (मुख्य कार्यकारी संपादक) मो.9823995466


उमरखेड (दिनांक 10 नोहेंबर) महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक पक्षाच्या जाहीर सभा उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये सुरू झाल्या आहेत.आज उमरखेड येथे भाजपाचे अधिकृत उमेदवार किसनराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ नितिन गडकरी यांची जाहीर सभेचे आयोजन भारतीय जनता पार्टी कडून करण्यात आली होती.


यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उत्तमराव इंगळे (माजी आमदार), नामदेव ससाणे (आमदार), अंकुश देवसरकर, महेश कलेश्वरकर, प्रकाश दुधेवार,अतुल खंदारे, बबलू जाधव, इत्यादी अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते.यावेळी मुख्य अतिथी मा. नितीन गडकरी यांनी शेतकरी यांच्या विकासात्मक धोरण जनते समोर ठेवून या सभेला संबोधित केले.शेतकऱ्यांचे कल्याण कराच. आत्महत्या थांबवायचा आहेत, तरुण युवकांना रोजगार संधी मिळाल्याचे काम करायचे आहे. गाव संमृध करायचे आहे. देशाचा विकास करायचा आहे. अशी धोरणे आणि निती आखायची आहे. असे प्रतिपादन नितीन गडकरी यांच्या उमरखेड येथील भाजपाचे अधिकृत उमेदवार किसनराव वानखेडे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.



ते म्हणाले की, काँग्रेस हे म्हणत आहे की, भाजपा संविधान बदलनार आहे.असा अपप्रचार करता आहे. पण घटनेची मूलभूत तत्वे बदलता येत नाहीत. लोकराज, समाजवाद, धर्म निरपेक्षता, मूलभूत हक्क, फंडामेटल हे कोणाचे सरकार आले तरी बदल ता येत नाही. हे बाबासाहेबांच्या संविधानाच्या मूलभूत हक्क बदलता येत नाहीत.या देशाचं संविधानाची मोडतोड करण्याचे पाप काँग्रेस पक्षाने केले आहे. आणि आम्ही भारतीय संविधान बदलनार नाही, कोणाला संविधान बतदलू देणार नाही. आणि कोणालाच संविधानाला हात लावू देणार नाही एवढी ताकद आम्ही करतो.

या ठिकाणी भाजपाचे उमेदवार किसनराव वानखेडे यांना प्रचंड बहुमताने आपण सर्व निवडून आणावे असे आव्हान उपस्थित जनतेला केले आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय गुजरे यांनी केले तर आभार प्रकाश दुधेवार यांनी केले.
या कार्यक्रमाचे उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील हजारो मतदार बंधू भगिनी आणि तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
