



✒️ शामभाऊ धुळे मुख्य संपादक मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (मुख्य कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 10 नोव्हेंबर) उमरखेड – महागाव विधानसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पार्टी तसेच परिवर्तन महाशक्ती प्रजा शक्ती क्रांती दलाचे समर्थित अपक्ष उमेदवार भाविक दिनबाजी भगत यांच्या प्रचाराची झंजावात सुरुवात झाली असून अनेक गावांमध्ये भेटी देऊन भाविक भगत यांना संपूर्ण जनतेने पाठिंबा दिला आहे.



महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, मतदार संघात प्रचाराचा झंजावात हा मोठ्या प्रमाणात सुरू असून,हा प्रचाराचा झंजावात दौरा बंदी भागात महागाव तालुक्यात सुद्धा सपाटून सुरू झालेला दिसून येत आहे. बंदीभागातील वेगवेगळ्या गावात महागाव तालुक्यात, भाविक भगत प्रहार जनशक्ती पार्टी परिवर्तन महाशक्ती प्रजा शक्ती क्रांती दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचार प्रसार करताना मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

या मध्ये भवानी, बोरगाव, मन्याळी, बिटरगाव, अकोली ,जेवली,बोरी, थेरडी, चुरमुरा,भोसा, तिवरंग, पोहंडूळ, दहिसावळी, धनोडा, हिवरा या गावात भाविक भगत यांच्या सह प्रहार जनशक्ती पार्टी परिवर्तन महाशक्ती प्रजा शक्ती क्रांती दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते झंझावात दौरे करत आहेत.

