
(उमरखेड मध्ये रेल्वे इंजिन धावणार)
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
✒️ सिध्दार्थ दिवेकर (मुख्य कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 9 नोव्हेंबर) येथे भारतीय जनता पार्टी मधून नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दाखल झालेले. माजी आमदार राजेंद्र नजरधने त्यांच्या प्रचारार्थ आज मनसे प्रमुख तथा राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली या सभेकरिता तुफान गर्दी पहावयास मिळाली आहे.



या सभेला उमरखेड महागाव बंदी भागामधील आदिवासी बहूल भाग, व तांडा वस्ती मधून असंख्य जनसमुदाय उमरखेड येथे धडकल्यामुळे सभेला तुफान गर्दी झाली होती. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्याकरिता जनता अतुर झाली होती.यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात बोलताना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असून पहिली आत्महत्या ही उमरखेड विधानसभेमधूनच झाली आहे.व असे त्यांनी सांगितले त्यांनी शासनावर कडाडून प्रहार करताना हे सरकार शेतकऱ्याचे हाल केव्हा जाणणार ज्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची काय दशा असेल यावर सत्तेत असणाऱ्या सरकारने त्यांची केव्हा विचारपूस केली का?अशी कडाडून टीका त्यांनी यावेळेस केली. तुम्ही एक वेळेस आमच्या हातात सत्ता द्या आणि मग पहा हा महाराष्ट्र मी कसा घडवेल.यावेळी त्यांनी आपल्या ठाकरे शैलीत बोलतांना मी हेलिपॅड ते प्रचार सभा मंडपापर्यंत वैयक्तिक वाहनातून येत असताना रस्त्याची दुर्दशा दिसली या रस्त्यात खड्डेच खड्डे अढळले त्यावरून ते म्हणाले असे रस्ते जगात कुठेही नाही. आम्ही सत्तेत आल्यास जर का असे खड्डे आढळल्यास ठेकेदार यांना ठेकेदार यांना खड्ड्यात उभे करून मारु यावेळेस जनतेने टाळ्यांच्या कडकडात करीत त्यांच्या ठाकरे शैलीला प्रोत्साहन दिले.

यावेळेस त्यांनी माजी आमदार राजेंद्र नजधने यांना प्रचंड मतांनी निवडून द्या अशी विनंती त्यांनी जनसमुदायाला केली. मग पहा उमरखेड महागाव विधानसभेचा विकास कसा दिसेल. यावरून असे वाटते की उमरखेड निवडणुकीत रेल्वे इंजिन सुसाट वेगाने धावणार की काय अशी चर्चा सुरू आहे.
