(अपक्ष उमेदवार डॉ मोहन मोरे यांनी हरदडा येथे प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराची केली सुरुवात)


✒️ शामभाऊ (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (मुख्य कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 9 नोव्हेंबर) महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक पक्षांमध्ये फुटाफूट होऊन बंडखोरी निर्माण झाली. यामध्ये अनेक वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांमध्ये एक निष्ठेने काम करणारे डॉ.प्रा.मोहनराव मोरे यांना उमेदवारी तिकीट देण्याचे उद्धव ठाकरे यांनी कबूल केले होते पण उमरखेड विधानसभा अनुसूचित जाती ही काँग्रेस पक्षाला सीट जाहीर झाल्यामुळे मोरे यांना (उबाठा) यांच्याकडून उमेदवारी मिळू शकली नाही. मागील 40 वर्षापासून उमरखेड महागाव या मतदारसंघांमध्ये मोरे यांचे जवळीचे नाते प्रत्येक समाज बांधवांमध्ये आहे.


मोरे हे अनेक सामाजिक उपकरणांमध्ये सहभागी होऊन वेळोवेळी लोकांना मदत करण्याचे कार्य यांनी केले. आज नाईलाजाने त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून आज रोजी हरदडा येथे नारळ फोडून प्रचार सभेला सुरुवात करण्यात आली.

मोरे हे म्हणाले की, मला या पक्षांनी धोका दिला आहे माझ्यावर अन्याय केला आहे. मला ना इलाजाने अपक्ष उमेदवारी नामांकन दाखल करण्यात चे काम करावे लागले एकमेव बंडखोर म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. प्रत्येक पक्षामध्ये गटबाजी सुरू झाली आहे एका पक्षाचे दोन पक्ष निर्माण झालेले दिसून येत आहे त्यामुळे अपक्ष उमेदवारांची संख्या या विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेली दिसून येत आहे.


मी अपक्ष उमेदवार असून माझ्या मतदार बंधू-भगिनींना नम्र विनंती करतो की माझ्या दूरदर्शन टीव्ही संच या निशाणीवर बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा..! निवडून आल्यास मी उमरखेड या विधानसभेचा चेहरा मोहरा विकासाचे कामे करून बदलण्याचा प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन डॉ मोहन मोरे यांनी यावेळी हरदडा येथे प्रचारार्थ करण्यात आले.

या प्रचार सभेला अनेक तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषता गोर बंजारा समाज या ठिकाणी मोठ्या उत्साहात आनंदात उपस्थित होता.